Friday, March 31, 2023

‘काही गोष्टी आपल्या हातात नसतात’, म्हणत शिव ठाकरेने दिली बिग बॉसनंतर प्रतिक्रिया

सर्वात मोठा कॉंट्रोव्हर्शियल शो म्हणून बिग बॉस ओळखला जातो. नुकतेच बिग बॉसचे १६ वे पर्व संपले. बिग बॉसच्या या पर्वाने प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले. त्यामुळे शो चार आठवडे अजून वाढवला गेला. नुकत्याच संपन्न झालेल्या या शोच्या अंतिम फेरीत मंडळीच्या दोन जिगरी मित्रांमध्ये विजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळाली. शिव ठकरे आणि एमसी स्टॅन यांच्यामध्ये झालेल्या चुरशीच्या स्पर्धेनंतर एमसी स्टॅन विजेता घोषित झाला. स्टॅन विजेता बनल्यानंतर शिव ठाकरेने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

शिव ठाकरे मराठी बिग बॉस जिंकल्यानंतर बिग बॉस १६ नक्कीच जिंकेल असे लोकांना वाटत होते. मात्र यावेळेस तो जेतेपद मिळवण्यापासून थोडक्यात चुकला. शिवला अंतिम फेरीत एमसी स्टॅनकडून पराभव पत्करावा लागला. शिव बिग बॉस १६ चा पहिला रनरअप राहिला. मात्र सोशल मीडियावर नेटकरी चांगलीच नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. सगळ्याची इच्छा होती की, शिव ठाकरे जिंकावा मात्र, असे काही घडले नाही. शिवने घरातून बाहेर आल्यानंतर मीडियाशी बोलताना प्रतिक्रिया देत स्वतःच्या पराभवावर भाष्य केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

शिव ठाकरेने बिग बॉस १६ मध्ये उत्तम खेळ खेळत सर्वच प्रेक्षकांची मने जिंकली. मीडियासोबत बोलताना त्याने स्टॅनकडून मिळालेल्या पराभवाबद्दल बोलताना सांगितले की, “जे व्हायचे होते ते झाले. ट्रॉफी मंडळींकडे आली आणि माझा मित्र एमसी स्टॅन जिंकला त्याच्या हातात ती आहे. याचा मला आनंद आहे, सोबतच एमसी शेवट्पर्यंत विजेत्याच्या शर्यतीत राहिला याचा देखील आनंद आहे. जी जी गोष्ट मी मनापासून केली ती मला मिळाली. मला देखील खूप कौतुक प्रेम मिळाले. ज्या गोष्टीसाठी मी इथे आलो ती घेऊन जात आहे.”

पुढे शिव म्हणाला, “काही गोष्टी आपल्या हातात नसतात. मात्र यातही काही गोष्टी चांगल्यास्तही डॆहील होतात. कारण तुमच्यात असणारी भूक कमी नको व्हायला. आता माझी भूक अधिकच वाढली आहे. आता जे जे दरवाजे उघडतील तिथे मी मनापासून काम करेल. जे मला ओळखतात ते देखील खुश आहेत. मी नक्कीच त्यांच्यासोबत आहे, जे माझ्यासोबत उभे आहेत. मी नक्कीच त्यांना त्यांचे स्वप्न मिळवून देण्यात मदत करेल.” तत्पूर्वी याच शोमध्ये शिवला रोहित शेट्टीने त्याच्या आगामी खतरो के खिलाडी शोची ऑफर दिली आहे. आता तो या शोमध्ये दिसेल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट ‘या’ तारखेला हाेणार प्रदर्शित

राजकुमार हिरानी बनवणार लाला अमरनाथांचा बायाेपिक, ‘खिलाडी’ अक्षय दिसणार मुख्य भूमिकेत?

हे देखील वाचा