Wednesday, March 29, 2023

चाहत्यांची प्रतीक्षा संपली! ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट ‘या’ तारखेला हाेणार सिनेमागृहात प्रदर्शित

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे एकत्र येऊन मराठी सिनेसृष्टीला नेहमीच काहीतरी भन्नाट देतात. असाच एका जबरदस्त चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे सज्ज झाले आहेत. काही महिन्यांपूर्वीच हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाचे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला हाेता. अशात आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही समाेर आली आहे.

पोलीस आणि डाकू यांच्यातील चकमक यात दिसत आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागलेली असतानाच आता या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर झळकले आहे. यात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या 7 एप्रिल रोजी ‘घर बंदुक बिरयानी’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि नागराज पोपटराव मंजुळे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एकाच वेळी मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.

marathi movie

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी यापूर्वी एकत्र येऊन ‘फॅंड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ यांसारखे सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आणि आता ‘घर बंदुक बिरयानी’ हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट ते आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत.(The wait for fans is over! The movie ‘Ghar Banduk Biryani’ will release on this date)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिषेक पाठक अन् शिवालिका ओबेरॉय अडकेल विवाह बंधनात, पाहा व्हिडिओ

अभिमानास्पद! आर माधवनच्या मुलाने केली सुवर्ण कामगिरी; ट्वीट शेअर करत अभिनेता म्हणाला,’खूप कृतज्ञ…’

हे देखील वाचा