Sunday, August 3, 2025
Home टेलिव्हिजन हे पाहिलं का? श्रीजीता अन् शालीन भानोतची मैत्री पाहून टीनाला अश्रू अनावर

हे पाहिलं का? श्रीजीता अन् शालीन भानोतची मैत्री पाहून टीनाला अश्रू अनावर

छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त शाे ‘बिग बॉस 16‘च्या प्रत्येक एपिसोडसोबत स्पर्धकांची विजेता बनण्याची रेसही वाढत आहे. अशा परिस्थितीत, नवीन स्पर्धकांची एंट्री पाहून कुटुंबातील सदस्य नाराज होणे सामान्य आहे. आता श्रीजीता डे बिग बॉस 16 च्या घरात पहिली वाईल्ड कार्ड एंट्री करणार आहे. अलीकडेच, निर्मात्यांनी श्रीजीता डेच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीचा टीझर रिलीज केला, ज्यामध्ये अभिनेत्री अतिशय सस्पेन्सपूर्ण पद्धतीने प्रवेश करते. सलमान खानच्या शोमधून बाहेर काढण्यात आलेली श्रीजीता ही पहिली स्पर्धक होती.

बुधवारी (दि. 7 डिसेंबर)ला शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, बिग बॉसने घरातील सदस्यांना माहिती दिली की, सूड घेण्यासाठी पहिली वाईल्ड कार्ड म्हणून श्रीजीता डे (sreejita de) शोमध्ये प्रवेश करणार आहे. श्रीजीता घरात शिरताच तिचे टीना दत्तासोबत वादावादी सुरू होते. श्रीजीता टीनाच्या निगेटिव एनर्जीकडे लक्ष वेधते, ज्याला टीना रागाने उत्तर देते, “हे तुझे मत आहे.”

श्रीजीता म्हणते, “प्लीज माझ्या निगेटिव एनर्जीतून बाहेर जा.” यावर टीना बिग बॉसला विचारते, “तुम्ही मला आनंदी पाहू शकलात नाही?” दरम्यान, श्रीजीताने शालिन भानोतच्या जवळ येऊन आनखिनच आगित तेल टाकले. अभिनेत्याला मिठी मारून ती म्हणाली, “आता मी शालिनला मिठी मारू शकते.” दुसरीकडे टीना किचनकडे जाते आणि तिचा राग काढू लागते.

 

View this post on Instagram

 

शालिनसोबतच्या नात्यामुळे आणि तिच्या वागण्यामुळे आधीच चर्चेत असलेल्या टीनासाठी श्रीजिताच्या प्रवेशामुळे आणखी समस्या निर्माण होणार आहेत. श्रीजिताच्या एन्ट्रीचा एपिसोड आज (दि.8 डिसेंबर)ला रात्रीच टेलिकास्ट होईल. श्रीजिताच्या एंट्रीवरून प्रेक्षक असाही अंदाज लावत आहेत की, या आठवड्यात टीना दत्ताला घरातून बाहेर काढले जाणार नाही. (bigg boss 16 sreejita de enters in the show as first wild card actress tina datta seems upset)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रियांका चोप्राने उघड केले बॉलिवूडचे कटू सत्य; म्हणाली, ‘काळी मांजर म्हणायचे…’

ही तर हाईटच झाली! प्रमोशन करण्यासाठी थेट अभिनेत्रीच्या पायात पडला प्रसिद्ध दिग्दर्शक

हे देखील वाचा