Thursday, February 22, 2024

एक्स गर्लफ्रेंड नाजिलाने उतरवला मुनावर फारूकीचा मुखवटा; इन्स्टा लाइववर येऊन सांगितलं सर्वकाही!

बिग बाॅस 17(Big Boss 17) सध्याला फारच चर्चेत आहे. एकीकडे शो त्याच्या अंतिम टप्याकडे वाटचाल करत आहे. तर दुसरीकडे शोमध्ये नवनवीन वाद समोर येत आहेत. त्यातही शोमधील स्पर्धकांच्या दोन जोड्या भलत्याच चर्चेत आहेत. त्यातील एक अंकिता- विक्की आणि दुसरी जोडी आहे मुनव्वर आणि आएशाची(Munawar Sitaishi). नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये आएशा खानने(ayesha khan) मुनव्वरच्या पर्सनल लाइफ बद्दल खुप खुलासे केले. आणि मुनव्वरवर काही आरोपदेखील केले. त्याचसोबत मुनव्वरच्या(Munawar Faruqui) एक्स गर्लफ्रेंड नाजिला सिताशीने तिला सांगितलेल्या काही गोष्टीही तिने या एपिसोडमध्ये सांगितल्या. त्यानंतर मुनव्वरने त्याचा बचाव करण्यासाठी नाजिलावर आरोप केले. इतके दिवस नाजिला गप्प होती परंतु आता नाजिलानेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नाजिला आली रविवारी इन्स्टाग्रामवर लाइव
काल रविवारी नाजिला(Nazil Sitaishi) इन्स्टाग्रामवर लाइव आली होती . त्यावेळीच तिने तिची बाजु मांडताना सांगितले की, खुपसारे लोक माझ्याबद्दल बोलतायत जे बरोबर नाहीए. मला याविषयी बोलायचं नाही, पण काही लोक माझ्या बाजुची स्टोरीसुद्धा स्वतःच मांडत आहेत. माझ्याबद्दल जर काही असेल तर ते मी स्वतःच सांगणार.

नजिला पुढे म्हणाली- ‘ जे काही चाललंय ते मला मान्य नाही. पण आता हे प्रकरण माझ्या हाताबाहेर गेलंय. हो, मी माझ्या आयुष्यातील वैयक्तिक तपशील कोणाशीतरी शेअर केला होता. पण ते शेअर करताना माझी परिस्थिती खूप भावनिक होती. तेव्हा हे नॅशनल टीव्हीवर येईल हे मला माहीत नव्हतं. माझा हाच हेतू असता तर मी स्वतःच ते केलं असतं. पण मी तसं केलं नाही. मी उपस्थित नसलेल्या ठिकाणी माझं नाव घेऊन बोललं जातंय . मला कारण नसताना यात ओढलं जातय, हा अन्याय आहे. माझ्या विरोधात जे बोललं जोतंय ते योग्य नाही.

नाजिला म्हणाली, ‘मला कळत नाही की, मी त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असून तो असा कसा म्हणु शकतो की तो मला घाबरला होता. तो त्याची स्टोरी पलटवत आहे. स्वतःला वाचवण्यासाठी मला वाईट बनवलं जातंय. त्याला भीती वाटत होती की मी गोष्टी पब्लिक करेन, पण त्याने स्वतः आठवडाभरापूर्वी सांगितलं होतं की त्याला माहित आहे की मी असे काहीही करणार नाही. तसं, माझ्याकडेही त्याच्याविरुद्ध अनेक गोष्टी आहेत. पण मी त्यांचा वापर करणार नाही, खासकरून तेव्हा, जेव्हा तो तिथे नसेल. पण त्याने ते केलंय आणि त्या गोष्टी खऱ्याही नाहीत. जर मी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला तर आणखी 10 गोष्टी बाहेर येतील ज्यागोष्टींना तो डिफेंडसुद्धा करू शकणार नाही.पण मला स्वतःच्या फायद्यासाठी कोणाचेही नुकसान करायचे नाही.परंतू दोन्ही बाजूंनी माझी फसवणूक झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

’12 th फाईल’ नंतर चमकले विक्रांत मेस्सीचे नशीब, थेट एकता कपूरच्या प्रोडक्शनमध्ये मिळाली संधी
पहिल्यांदाच अंकिता-सुशांतच्या नात्यावर बोलला विकी जैन; म्हणाला, ‘तुझ्या अफेअरचे परिणाम मला भोगावे लागले…’

हे देखील वाचा