जेव्हाही रिऍलिटी शोजचा विचार होतो, तेव्हा बिग बॉसची (bigg boss)चर्चा तर होतेच बरोबर ना. तुम्हीही बिग बॉस पाहिलं असेलच आणि त्यातली भांडणं, गेम्समधील चढाओढ तर अगदी चवीनं पाहात असाल होना. पण बिग बॉस म्हटलं की नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा होत राहाते. दोन स्पर्धांमधील दुश्मनी कधी टोकाला जाते, तर कधी स्पर्धेक जीवाभावाचे मित्र बनतात, तर कधी दोन स्पर्धकांमध्ये प्रेमही निर्माण झाल्याचे दिसते. अशा प्रेम झालेल्या काही स्पर्धकांनी आपले प्रेम टिकवलेही आणि लग्नही केल. तर काही जोड्या मात्र बिगबॉसमधून बाहेर गेल्यावर तुटल्या… तर मंडळी तुम्हाला एकूणच लक्षात आलं असेल की व्हिडिओचा विषय काय असेल, तरीही सांगते. आज आपण काही प्रसिद्ध जोड्याबद्दल जाणून घेऊ, ज्यांच्यात बिग बॉसच्या घरात असताना प्रेम झालं होतं.
राकेश बापट आणि शमिता शेट्टी ही जोडीही बिग बॉसमधून सर्वांसमोर आली होती. शिल्पा शेट्टीची बहिण असणारी शमिता आणि राकेश यांच्यात बिग बॉस ओटीटी या शोदरम्यान एकमेकांवर प्रेम झाले. त्यांनी त्यांचे प्रेमही या शोदरम्यान व्यक्त केले होते. ते बिगबॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही एकमेकांबरोबर दिसले. सोशल मीडियातूनही ते प्रेम व्यक्त होत होते. पण काही काळाने ते परस्पर समजूतीने वेगळे झाले.
बिग बॉसमध्ये गाजलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी. हे दोघेही बिग बॉसच्या ९ व्या हंगमादरम्यान भेटले होते. त्यावेळी नोरा फतेही, प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांच्यातील लव्ह ट्रँगलमुळे बऱ्याच कॉन्ट्रावर्सी झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण अखेरीस प्रिन्स नरुलाने युविकाला शोदरम्यान हार्टशेपचा पराठा बनवत प्रपोज केले होते. त्यानंतर काहीवर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २०१८ मध्ये लग्न केले.
कुशल टंडन आणि गौहर खान ही जोडीही बिग बॉस शो दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. हे दोघेही बिग बॉस ७ चे स्पर्धक होते. कुशलने गौहारला प्रपोजही केले होते. गौहरने त्यावेळी बिगबॉसचा किताब जिंकला होता. पण बिगबॉसमधून बाहेर आल्यावर या दोघांनी एकमेकांना डेटही केले होते.पण अखेरीस २०१७ मध्ये या दोघांनी ब्रेकअप केले. त्यानंतर गौहरने झैद दरबारबरोबर लग्न केले.
बिगबॉसमधून समोर आलेली आणखी एक जोडी म्हणजे पवित्रा पुनिया आणि एजाज खान. बिग बॉस १४ मधून दिसलेली ही जोडी. शोमध्ये त्यांची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. दोघेही खूप जास्त भांडताना दिसले होते. पण एजाजला तिच्याबद्दल प्रेम असल्याचे जाणवले. पवित्राही एलिमिनेट झाल्यानंतर फॅमिली विकवेळी एजाजला भेटायला आली होती. हे दोघे खूप भांडले असले तरी शो दरम्यान त्यांच्यात प्रेमही निर्माण झाले. आत्ताही ते दोघे एकत्र दिसतात.
बिगबॉसमधून आणखी एक जोडी समोर आली ती म्हणजे शेहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला. गेल्यावर्षी हृदयविकाराच्या धक्याने सिद्धार्थचे निधन झाले, त्यावेळी शेहनाजही खूप खचलेली दिसली होती. अनेक दिवस ती नैराश्यातही असल्याचे सांगण्यात आलेले. सिद्धार्थ आणि शेहनाज बिग बॉस १३ मध्ये एकमेकांच्या प्रेमात पडलेले. त्यानंतरही ते सिद्धार्थच्या अखेरच्या श्वासापर्यंत एकत्र असल्याचे दिसले होते.
हिंदी बिगबॉसमधून अनेक जोड्या समोर आल्या असल्या तरी मराठी बिग बॉसमध्ये एक जोडी सर्वाधिक गाजली. आणि ती जो म्हणजे शिव ठाकरे आणि विना जगताप यांची. बिगबॉसच्या घरात असताना या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचे प्रेमात रुपांतर झालेलेही पाहायला मिळाले. शिव बिगबॉस मराठी सिजन २ चा विजेताही ठरला. या शोमधून बाहेर आल्यानंतरही शिव आणि विना एकमेकांना डेट करत होते. पण, नंतर आशीही बातमी आली की हे दोघे वेगळे झाले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘सुलतान’च्या सेटवर अचानक पोहोचलेला ‘पठाण’, पुढं दोघांनीही केलं अविश्वसनीय कृत्य
‘पैसे मिळायचे पण…’ कपिल शर्मा शो सोडण्याचे कारण सांगताना हे काय बोलून बसली उपासना सिंग
वैवाहिक आयुष्यात आयुष्मान खुराना नाही सुखी म्हणाला ‘लग्न माझ्या आयुष्यातील मोठी चूक’