Wednesday, November 13, 2024
Home मराठी शिव ठाकरचं नवंकोरं ‘शिलावती’ गाणं झालं प्रदर्शित; रसिकांचा मिळतोय भरभरून प्रतिसाद

शिव ठाकरचं नवंकोरं ‘शिलावती’ गाणं झालं प्रदर्शित; रसिकांचा मिळतोय भरभरून प्रतिसाद

टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ हा सर्वांचा लोकप्रिय शो आहे. हिंदीमधील या शोची लोकप्रियता बघता हा शो मराठीमध्ये देखील सुरु केला गेला आहे. मराठीमध्ये या शोचे दोन सिझन पूर्ण झाले आहेत. यातील सर्वात चर्चेत दुसरा सिझन आणि यातील स्पर्धक होते. या शोमधील सर्वांचाच लाडका आणि विजेता स्पर्धक म्हणजे शिव ठाकरे. शिव ठाकरे हा बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता होता. त्यानंतर तो खूप चर्चेत आला होता. परंतु तो नंतर काही खास निदर्शनास आला नाही. पण नुकतेच शिवचे एक नवे कोरे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे याची माहिती स्वतः शिवने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.

शिवने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या गाण्याचा पोस्टर प्रदर्शित करून, त्याच्या या नवीन गाण्याची माहिती प्रेक्षकांना दिली आहे. त्याने त्याच्या ‘शिलावती’ या गाण्याचा पोस्टर शेअर केला असून, हे गाणे प्रदर्शित झाले आहे असे सांगितले आहे. या गाण्यामध्ये त्याच्यासोबत मीरा जगन्नाथ ही अभिनेत्री दिसत आहे. या गाण्यात दोघांचीही कमालीची मस्ती आणि केमिस्ट्री दिसत आहे. या गाण्याचे बोल ‘शिलावती शिलावती मागे वळून बघ’ हे आहे. या गाण्याचे बोल जय अत्रे यांनी लिहिले आहे, तर वरून लिखटे यांनी हे गाणे गायले आहे. तसेच या गाण्याला संगीत देखील त्यांनीच दिले आहे. त्यांचे हे गाणे प्रेक्षकांना जबरदस्त आवडत आहे. तसेच यामध्ये शिवचा जबरदार डान्स पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षक खूप खुश झाले आहेत. या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे गाणे प्रदर्शित होऊन केवळ चार तास झाले आहेत, पण या गाण्याला आतापर्यँत १२ हजारापेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. (marathi bigg boss fame shiv thakare’s new sog shilavati release)

शिवने याआधी एम टीव्हीवरील ‘रोडीज’ या शोमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर तो ‘बिग बॉस’मुळे खूप चर्चेत आला होता. या शोमध्ये त्याचे आणि विना जगतापचे अफेअर खूप गाजले होते. तसेच मीरा जगन्नाथ ही देखील एक अभिनेत्री आहे. तिने याआधी अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत देखील काही काळासाठी संजना ही भूमिका साकारली होती. ती सध्या झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिचे मोमो नावाचे पात्र प्रेक्षकांना खास पसंत पडत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केवळ लारा दत्ताचा नाही, तर ‘या’ कलाकारांनी देखील परफेक्ट लूकसाठी घेतला होता प्रोस्थेटिक मेकअपचा आधार

-बालकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळवणारा आदित्य नारायण मुख्य नायकाच्या भुमिकेत ठरला अपयशी; तर ‘या’ वादांशी जोडलं गेलंय त्याचं नाव

-अबब! चक्क ‘इतका’ महागडा ड्रेस घालून वाणी कपूर पोहचली ‘बेलबॉटम’ सिनेमाच्या प्रमोशनला

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा