Monday, July 8, 2024

‘…म्हणून मी लग्नासाठी होकार दिला’, अमृताने सांगितलं मोठं कारण, म्हणाली…

अमृता देशमुख ही मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारी एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने तिच्या अभिनय कौशल्याने आणि मेहनतीने मराठी मनोरंजनसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृताने तिच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली होती. तिने ‘तुमचं आमचं सेम असतं’, ‘फ्रेशर्स’, ‘देवा शप्पथ’, ‘मी तुझीच रे’, ‘आठशे खिडक्या नऊशे दार’ या मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या होत्या. यानंतर ती अनेक मराठी चित्रपटातही ती झळकली.सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

अमृता देशमुख (Amrita Deshmukh) ही मराठी मनोरंजनसृष्टीची एक उगवती कलाकार आहे. तिने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातच अनेक यशस्वी भूमिका साकारल्या आहेत.  मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांच्या लग्नाची बातमी ऐकून चाहत्यांना खूप आनंदाची झाली आहे. नुकतंच एका मुलाखतीत अमृताने प्रसादबरोबर लग्न करायला होकार का दिला, या मागच्या कारणाचा खुलासा केला आहे.

अमृताने सांगितलं की, “तिला प्रसादमधील अनेक गोष्टी आवडतात. तो घर खूप चांगलं नीटनेटकं ठेवतो. मला स्वयंपाकाची तेवढी आवड नाहीये, पण प्रसाद खूप चांगलं जेवण बनवतो. त्याला सगळचं येतं. मला रोजचं आयुष्य जगण्यासाठी हा पार्टनर म्हणून हवा आहे हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, तेव्हा मी आणि प्रसादने एकत्र राहायला सुरुवात केली.”

अमृताने पुढे सांगितलं की, लग्न हे ओघाने येतंच. एका ठराविक टप्प्यानंतर लग्न येतंच. आम्हाला एवढं कळालं होतं की, एकत्र राहायचं आहे. पण, मग घरचे विचारत होते एकत्र राहायचं आहे तर लग्न करणार आहात ना तुम्ही. लग्नाचा विषय अचानक नाही निघत आपल्याकडे. तो खूप चर्चा करूनच निघतो. हळूहळू त्या गोष्टी बाहेर निघत गेल्या आणि मग आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.”

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांची लग्नाची तारीख 18 नोव्हेंबर 2023 ठरली आहे. अमृता आणि प्रसाद यांची ओळख ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वात झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काही महिन्यांपूर्वीच त्यांनी साखरपुडा केला होता.अमृता आणि प्रसाद यांची लग्नसोहळा पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. लग्नाला मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. अमृता आणि प्रसाद या दोघांनाही चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. (Bigg Boss fame Marathi actress Amrita Deshmukh reveals the reason why she agreed to marry actor Prasad Jawade)

आधिक वाचा-
मालतीच्या जन्मानंतर प्रियांका चोप्रा झाली होती ‘कमकुवत’, अभिनेत्रीने सांगितली आव्हाने
तुझ्याकडे गाडी नाहीये का? गौतमीने दिले ट्रोलर्सला सडेतोड उत्तर, थेट म्हणाली…

हे देखील वाचा