Friday, March 29, 2024

‘ससुराल गेंदा फुल’, म्हणत देशमुख कुटुंबाने केला अदितीसोबत भन्नाट डान्स

झी मराठी या वाहिनीवरील सगळ्याचा मालिका खूप लोकप्रिय होत आहेत. या वर्षी तब्बल ५ नव्या मालिका एका वेळेस एकाच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. प्रत्येक मालिकेची कहाणी वेगळी आणि नवीन माहिती देणारी आहे. अशातच ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका खूप गाजत आहे. आजकाल एकत्र कुटुंबपद्धती लुप्त होत चालली आहे. प्रत्येकाला त्यांच्या जीवनातील एकांत पाहिजे आहे. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती नाहीशी होत चालली आहे. परंतु एकत्र कुटुंब नक्की काय असते याचे दर्शन या मालिकेने प्रेक्षकांना दिले आहे. सगळेजण एकत्र गुण्या गोविंदाने एका घरात राहू शकतात याची माहिती या मालिकेतून मिळते.

अशातच मालिकेत अत्यंत इंटरेस्टिंग ट्रॅक चालू झाला आहे. मालिकेत अदिती आणि सिद्धार्थचे लग्न होताना दिसत आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात वाढलेल्या या मुलीला सुरुवातीला माणसांची भीती वाटायची, पण आज तीच मुलगी या कुटुंबात लग्न करायला तयार झाली आहे. मालिकेत सिद्धार्थ आणि अदितीचे लग्न गावाकडच्या पद्धतीने सगळ्या रीती रिवाजानुसार दाखवण्यात आले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (tujya majya sansarala aani kay hav serial actors dance)

अशातच संपूर्ण देशमुख कुटुंबाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थचे संपूर्ण कुटुंब अदितीसोबत डान्स करत आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘ससुराल गेंदा फुल’ हे गाणे लागले आहेत. या व्हिडिओमध्ये सगळ्यांचा अभिनय चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. ही मालिका सध्या जोरदार चर्चेत आहेत.

या मालिकेत हार्दिक जोशी आणि अमृता पवार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हार्दिकने या आधी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेतील त्याचे राणा नावाचे पात्र खूप गाजले होते. तसेच अमृताने ‘ललित २०५’ आणि ‘दुहेरी’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

हेही वाचा :

‘शेवटच्या क्षणापर्यंत राजासारखे जगले’, प्रकाश मेहरांनी दिला राजेश खन्ना यांच्या स्मृतींना उजाळा 

अशाप्रकारे आलिया, कॅटरिना आणि प्रियांका झाल्या ‘जी ले जरा’ चित्रपटासाठी तयार, जोया अख्तरने केला खुलासा

काय सांगता! राजेश खन्ना अन् मुमताज यांच्या ‘या’ सिनेमातील क्लायमॅक्स सीनच्या चित्रीकरणासाठी लागले होते आठ दिवस

 

हे देखील वाचा