कुटुंबीयांना मिळणार सिद्धार्थ शुक्लाचे पार्थिव आणि पोस्टमोर्टम रिपोर्ट्स, उद्या होणार अंतिम संस्कार

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्ला अनपेक्षितपणे काळाच्या आड गेल्याने संपूर्ण सिनेसृष्टी हळहळ व्यक्त करत आहेत. त्याचा गुरुवारी (२ सप्टेंबर) मृत्यू झाला आहे. त्याला हृद्य विकाराचा झटका आला आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुपारपासून त्याचे पोस्टमोर्टम चालू होते. पण अजूनही काही रिपोर्ट हाती आला नाही. पोलिसांचा देखील तपास चालू आहे. पण त्याच्या कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाहीये. अशातच रुग्णालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

रुग्णालयातून आलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट अजूनही आले नाही. त्याचे रिपोर्ट उद्या ३ सप्टेंबर रोजी सकाळी येणार आहे. त्यामुळे त्याचे पार्थिव देखील उद्या ३ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता त्याच्या कुटुंबाच्या हातात सोपवण्यात येणार आहे. उद्या सकाळी त्याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जाणार आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट न आल्याने त्याच्या मृत्यूचे कारण देखील अजून अस्पष्ट आहे. पण आता त्याचा मृत्यू नक्की कोणत्या कारणाने झाला आहे, हे आपल्या सर्वांना उद्या सकाळीच समजणार आहे. (bigg boss fame sidharth shukla’s death, his postmortam report will come tomorrow)

View this post on Instagram

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

डॉक्टरांनी सिद्धार्थला मृत घोषित केल्यांनतर त्याचे कुटुंब घरी परतले. त्याच्या शेवटच्या क्षणी त्याच्यासोबत त्याची आई, बहीण आणि त्याचे मेहुणे होते. तसेच त्याची अगदी जवळची मैत्रीण शहनाझ गिल देखील त्याच्या कुटुंबासोबत उपस्थित होती, अशी माहिती समजत आहे.

सिद्धार्थच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ बुधवारी रात्री एकदम ठीक होता. तो औषधे खाऊन झोपला आणि सकाळी उठलाच नाही. सगळ्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण त्याने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. मग त्याची बहिणी आणि मेहुण्यांनी त्याला रुग्णालयात नेले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. त्यामुळे आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर त्याच्या मृत्यूचे कारण समजणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिग ब्रेकिंग! सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

-बहीण आणि मेहुण्याने बेशुद्ध अवस्थेत सिद्धार्थला नेले होते रुग्णालयात; वाचा कोण आहे त्याच्या कुटुंबात

‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?

Latest Post