Sunday, June 23, 2024

हॉटनेसचा तडका! उर्फीच्या साडीतील फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा, नेटकरी म्हणाले, ‘फायर ब्रिगेडला…’

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’ला ओळखले जाते. बिग बॉसमधून अनेक स्पर्धकांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. ही लोकप्रियता टिकवून ठेवता येणे फार कठीण असते. मात्र, यामध्ये पटाईत असलेली अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद होय. बिग बॉसच्या बाहेरही उर्फी सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. कधी आपल्या फॅशन सेन्समुळे, तर कधी बोल्ड फोटोंमुळे ती चाहत्यांना घायाळ करत आहे. मात्र, अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. नेहमीच बोल्ड आणि हॉट ड्रेसमुळे चर्चेत असणाऱ्या उर्फीने सुंदर साडीतील फोटो शेअर केले आहेत. मात्र, तिने या फोटोंनीही सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.

उर्फीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपले साडीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने रंगीत साडी आणि लाल रंगाचा ब्लाऊज घातला आहे. या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. (Bigg Boss Fame Urfi Javed Shared A Photo In A Saree Users Gave Such Reactions)

उर्फीने हे दोन फोटो शेअर करत झक्कास कॅप्शनही दिले आहे. तिने आपल्या कॅप्शनमध्ये “सिंड्रेला,” असे लिहिले आहे. तिच्या या फोटोंना आतापर्यंत ३० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. याव्यतिरिक्त तिचे चाहते कमेंट्सचाही पाऊस पाडत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की, “तू सर्वात चांगली आहेस.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “मला आता फायर ब्रिगेडला बोलवावे लागेल.” आणखी एक चाहता कमेंट करत म्हणाला की, “उफ्फ.” एकाने तर तिला कमेंट करत थेट “माझं तुझ्यावर प्रेम आहे,” असे म्हटले आहे. याव्यतिरिक्त अनेक चाहते फायर आणि लव्ह इमोजींचा वर्षाव करताना दिसत आहेत.

यापूर्वी उर्फीने एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्येही तिने आपल्या हॉटनेसचा जलवा दाखवला होता. यावेळीही ती साडी आणि ब्लाऊजमध्ये दिसली होती. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘ओय होय लडकी’ हे गाणे वाजत होते. दुसरीकडे उर्फीने इंस्टाग्रामवर पारदर्शी कपड्यांतील व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यामुळे तिला नेटकऱ्यांनी अक्षरश: धारेवर धरले होते. तिच्या पोस्टवर नेटकरी ‘तुला लाज कधी वाटेल,’ अशाप्रकारच्या कमेंट्सही करतात. मात्र, तिला कधीही याचा फरक पडत नाही.

उर्फीची कारकीर्द
नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेद सुरुवातीच्या काळात मॉडेलिंग करत होती. २०१६ मध्ये उर्फीला ‘बडे भैया की दुल्हनिया’ या टेलिव्हिजन मालिकेतून ब्रेक मिळाला. या मालिकेत तिने अवनी पंतची भूमिका साकारली होती. यानंतर तिला दुसऱ्या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. ‘चंद्र नंदिनी’ या मालिकेत उर्फीने राजकुमारीची भूमिका साकारली होती. येथून तिला ओळख मिळाली. यानंतर ती ‘मेरी दुर्गा’, ‘सात फेरे की हेरा फेरी’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘बेपनाह’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकांमध्ये दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लाल बिकिनी घालून बीचवर ‘Chill’ करताना दिसली दिशा पटानी, बोल्ड फोटोला मिळतेय चाहत्यांची पसंती

-जेव्हा सुंदर ड्रेस अचानक खिसकला खाली, भर इव्हेंटमध्ये ‘Oops Moment’ची शिकार झाली मलायका अरोरा

-‘कमरिया’ गाण्यावर ताल धरत, नोराने स्टेजवर लावली आग! व्हायरल होतोय व्हिडिओ

हे देखील वाचा