Tuesday, June 18, 2024

‘कमरिया’ गाण्यावर ताल धरत, नोराने स्टेजवर लावली आग! व्हायरल होतोय व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आजकाल तिच्या नुकत्याच रिलीझ झालेल्या ‘कुसु कुसू’ या गाण्यासाठी चर्चेत आहे. दिलबर गर्ल तिच्या गाण्याचे जोरदार प्रमोशनही करताना दिसत आहे. दरम्यान, अभिनेत्रीचा एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिने तिच्या ‘कमरिया’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आणि ‘इंडियाज बेस्ट डान्सर २’ च्या सेटवर अक्षरशः आग लावली, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

नुकतीच नोरा ‘इंडियाज बेस्ट डान्सर २’ च्या सेटवर पोहोचली. इथे तिने ‘कमरिया’ गाण्यावर स्पर्धकांसोबत डान्सही केला. निर्मात्यांनी ‘इंडियाज बेस्ट डान्सर २’चा प्रोमो रिलीझ केला. या प्रोमो व्हिडिओमध्ये नोरा फतेही ‘कमरिया’ गाण्यावर २ स्पर्धकांसोबत नाचताना दिसत आहे. (nora fatehi dance on kamariya song at india best dancer 2 video raises the temperature on internet)

निळ्या रंगाचा आऊटफिट घातलेल्या नोरा फतेहीच्या या जबरदस्त डान्स व्हिडिओने पुन्हा एकदा इंटरनेटवर जलवा केला आहे. चाहते पुन्हा त्याच्या स्लिम कंबरेवर घसरताना दिसत आहेत. टोन्ड फिगर आणि मादक स्टाईलमुळे ‘इंडियाज बेस्ट डान्सर २’च्या मंचावरील अभिनेत्रीचा हा डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांकडून चांगलाच पसंत केला जात आहे.

अभिनेत्री आणि टी-सीरिजचा मालकीण दिव्या खोसला कुमार देखील नोरा फतेहीसोबत शोमध्ये पोहोचली होती. दिव्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सत्यमेव जयते २’ चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहे. या एपिसोडमध्ये चंकी पांडे आणि नीलम कोठारी देखील पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शो दरम्यान नोरा फतेही आणि टेरेन्स लुईस देखील ऑन-क्रीम रोमँटिक केमिस्ट्री दाखवताना दिसतील.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘डॅड स्टॉप इट यार!’, एनसीबीच्या ऑफिसबाहेर वडिलांचे वागणे पाहून वैतागला आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंट

-Bigg Boss 15: रितेशच्या अगोदर एका डॉनसोबत होतं राखी सावंतचं अफेअर, स्वतः केला खुलासा

-‘फिट ऍंड फाईन’ दिसणारे अनिल कपूर ‘या’ आजाराने आहेत त्रस्त, व्हिडिओ शेअर करत स्वत: केला खुलासा

हे देखील वाचा