Friday, July 5, 2024

हॉट फोटोंनंतर आता उर्फीच्या व्हिडिओचा सोशल मीडियावर राडा, युजर म्हणाला, ‘हाये उर्फी खिलादो ना कुल्फी’

जितकी चर्चा मोठ्या पडद्यावरील कलाकारांची होत नाही, कदाचित त्यापेक्षाही जास्त चर्चा ही छोट्या पडद्यावरील काही मोजक्या कलाकारांची दररोज होताना दिसते. असेच काहीसे ‘बिग बॉस ओटीटी’मधून बाहेर पडलेल्या उर्फी जावेदबाबत आहे. आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत आलेली उर्फी ही चाहत्यांसाठी नेहमीच काही ना काही शेअर करत असते. काहीवेळा तिला आपल्या या विचित्र ड्रेसिंगमुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र, ती त्यांना दुर्लक्ष करत, आपल्याला करायचं तेच करते. अनेकदा ती ट्रोलर्सला सडेतोड प्रत्युत्तरही देते. आताही उर्फीची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नुकतेच उर्फीने आपले काही हॉट फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती ऍनिमल प्रिंटेड ब्रा आणि स्कर्टमध्ये दिसली होती. यानंतर आता तिने आपला एक हॉट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने स्किन रंगाचा टॉप आणि स्कर्ट परिधान केली आहे. व्हिडिओत दिसते की, आधी उर्फी आपला टॉप आणि स्कर्ट सांभाळताना आपली कंबर दाखवते. त्यानंतर ती आपले इअरिंग फ्लॉन्ट करते. यानंतर उर्फी समोरून कॅट वॉक करत येते आणि आपला हॉट फिगर फ्लॉन्ट करते. (Bigg Boss Fame Urfi Javed Shares Her Hot And Bold Video In Nude Colour Skirt And Crop Top)

हा व्हिडिओ शेअर करत उर्फीने स्वत:ला नागिन म्हटले आहे. उर्फीच्या ड्रेसचा रंग तिच्या रंगाशी मिळता जुळता आहे. त्यामुळे काही सेकंदासाठी चाहते गोंधळातदेखील पडले आहेत. काही लोकांनी यामुळे तिला ट्रोल करत तिच्या ड्रेसवर कमेंटही केली आहे. याव्यतिरिक्त उर्फीच्या या व्हिडिओत चाहत्यांना तिच्या हातावर झालेल्या दुखापतीचे निशानही दिसले आहेत, ज्यामुळे चाहते तिला अनेक प्रकारचे वैयक्तिक प्रश्नही विचारत आहेत. एकाने विचारले की, “हा लव्ह बाईट आहे का?” दुसरीकडे काहीजण नखांनी ओरबाडल्याचे बोलत आहे.

उर्फीच्या या व्हिडिओवर अभिनेत्री राखी सावंतने “वाव,” अशी कमेंट केली आहे. तसेच चाहते कमेंट्स करत आपापल्या प्रतिक्रियाही देत आहेत. एकाने लिहिले आहे की, “हाये उर्फी खिलादो ना कुल्फी.” आणखी एकाने लिहिले की, “तू तर प्रत्येक ड्रेसमध्ये पटोला दिसतेस.”

उर्फीच्या या व्हिडिओला आतापर्यंत ३ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, ५० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ही दोस्ती तुटायची नाय! आशिष चंचलानीला दिलेले ‘ते’ वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये

-कमल हसन यांच्या ‘विक्रम’ सिनेमाने प्रदर्शनाआधीच केला रेकॉर्ड, चित्रपटाच्या फर्स्ट लुकला प्रेक्षकांचा अमाप प्रतिसाद

-जड आवाजामुळे वर्गातून हाकलले जायचे, नंतर त्याच आवाजाने दिली खरी ओळख; वाचा पॉप क्वीन उषा उत्थुपबद्दल

हे देखील वाचा