Monday, July 1, 2024

घरात गरम वातावरण अन्…म्हणून समर्थ ईशाच्या ब्रेकअपची रंगलीय चर्चा

काही दिवसांपूर्वीच बिग बॉस सीझन १७ चा ग्रँड फिनाले पार पडला. मात्र बिग बॉसच्या घरातील स्पर्धक काही ना काही कारणाने सतत चर्चेत येताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरातील अनेक घटना समोर आल्या. विशेष म्हणजे, अभिषेक कुमारसोबत (Abhishek Kumar) अभिनेत्री ईशा मालवीयचे Isha malviy) रिलेशनशिप आणि यासोबतच पुन्हा एकदा नव्याने समर्थ जुरेलच्या प्रेमात पडलेली ईशा अशी सगळी खिचडी संपूर्ण सीझनमध्ये चर्चेत रहिली.

आता पुन्हा एकदा ईशा समर्थ चर्चेत आले आहेत. बिग बॉसनंतर हे कपल वेगळे झाल्याची चर्चा चाहत्यांमध्ये सुरू होती. मध्यंतरी झालेल्या ‘बिग बॉस १७’ तल्या स्पर्धकांच्या रियुनियन पार्टीतही हे कपल एकत्र दिसले नव्हते. सध्या सोशल मीडियावर ईशा आणि समर्थचे ब्रेकअप होणार असल्याची चर्चा रंगली. मात्र, दोघेही नुकतेचं स्पॉट झाले असून याआधी का एकमेकांना भेटले नाहीत याचा खुलासा दोघांनी माध्यमांसमोर केला आहे.

‘बिग बॉस 17’ च्या काही स्पर्धकांना कलर्सच्या डान्स रिॲलिटी शो ‘डान्स दीवाने सीझन 4’ मध्ये आमंत्रित करण्यात आले होते. ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल यांनीही यात हजेरी लावली. पापाराझींनी दोघांना स्पॉट केले. दोघेही खुप आनंदी दिसले. हे पाहून पापाराझींनी ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल यांची जोडी अशीच राहिल असं म्हटले. त्यानंतर अभिनेत्रीने हात जोडून त्यांचे आभार मानले.

यानंतर तिला विचारण्यात आले की, दोघे एकत्र का दिसत नाहीत, तर अभिनेत्रीने सांगितले की, बिग बॉसनंतर घरात गरम वातावरण होते. तर समर्थ म्हणाला भेटायचं होत. पण वेळ नाही. दोघांच्या या उत्तरावरुन असे लक्षात येते की अद्याप घरच्यांना या दोघांचे नातं मान्य नाही.

काही दिवसांपूर्वीचं म्हणजे व्हॅलेंटाइन डे दिवशी समर्थने एक इंस्टावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये समर्थने, काही लोक कामात इतके व्यस्त आहेत की त्यांना प्रत्येकाला भेटायला आणि पोस्ट करायला वेळ मिळतो. पण आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटायला काहींना वेळ नाही. पण जाऊद्या, तुम्हा सर्वांना व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा. तुम्हाला आणि तुमच्या साथीदाराला खूप आशिर्वाद.” असं म्हटलं होतं. या स्टोरीनंतर सोशल मीडियावर समर्थ आणि ईशाच्या ब्रेकअपची चर्चा जोरदार रंगली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

डॉन ३ मध्ये प्रियांकाची जागा घेणार आता ‘ही’ अभिनेत्री, रणवीरसोबत पहिल्यांदाच झळकणार
स्ट्रगल काळात नोराने सहन केलाय खूप अपमान, अशाप्रकारे मिळाले सुरुवातीचे काम

हे देखील वाचा