Saturday, March 2, 2024

वुमन-बीटरच्या टॅगवर अभिषेक कुमारने केले दुःख व्यक्त, मुनावरच्या विजयावरही दिली प्रतिक्रिया

सलमान खानचा(Salman Khan) बिगबाॅस हा खुप काँट्रावर्शिअल शो आहे. या शोची खासियतंच यात होणारे वाद-विवाद आहेत. अशा या काँट्रावर्शिअल शोचा काल अंतिम टप्पा होता. काल रविवार, 28 जानेवारीला बिगबाॅस 17चा ग्रँड फिनाले पार पडला. या अंतिम टप्यात बिगबाॅस 17चा विजेत्याचं नावही घोषीत करण्यात आले. मुनावर फारूकी हा या सिझनचा विजेता झाला आहे. विजेत्याला 50 लाखांचा प्राइज मनी त्याच सोबत एक कारही देण्यात आली. याशोनंतर बिगबाॅसचा सेकंड फायनलिस्ट आणि उपविजेता म्हणलं तरी हरकत नाही अशा अभिषेक कुमारने मिडियाशी संवाद साधला. यावेळी अभिषेक ने काही गोष्टींचा खुलासा केला.

अभिषेक कुमारने त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि बिगबाॅसची कंटेस्टंट ईशा मालवीयच्या(Isha Malviya ) आरोपांवर मनमोकळेपणाने संवाद साधला. जेव्हा अभिषेक ‘उदारियां’ या मालिकेचा भाग होता तेव्हा त्याने ईशाला चापट मारल्याचा आरोप ईशाने केला होता.त्यावेळी अभिषेकला ‘वुमन-बीटर'(Women Beater) असा टॅगही दिला होता. या प्रसंगावरची अबोला तोडत अभिषेकने काल मिडियाशी संवाद साधला. तो म्हणाला,” ते जे काही होतं ते खुप चुकीचं होतं. कधी कधी परिस्थिती अशी होते की तुम्ही स्वतःवरचं नियंत्रण हरवून बसता. आणि माझ्यासोबतंही तेच घडलं. तसं टाळी दोन हातानेच वाजते. आणि मी त्याचं खुप प्रायश्चित्त केलं आहे. ”

‘वुमन-बीटर’च्या टॅगवर अभिषेक कुमारचं(Abhishek Kumar) दुःख समोर आलं आणि तो माफीच्या सुरात म्हणाला,” बिगबाॅसमध्ये(Big Boss 17) मी साडेतीन महिने घालवले आहेत. त्यामुळे जर मला आता माफी मिळाली नाही तर माझ्यासोबत हे खुप वाईट होईल. मला वाटतं मला माफी मिळावी आणि माझ्यावर लागलेला टॅग पुसला जावा. मी एका चांगल्या नोटवर पुढे जाऊ इच्छीतो. ”

अभिषेक कुमार ‘बिगबाॅस 17 ‘मधील ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल(Samarthh Jurel) सोबत असणाऱ्या त्याच्या भांडणावरही बोलला. त्याचसोबत समर्थला चापट मारण्यावरही त्याने त्याची प्रतिक्रिया दिली. अभिषेकने याला चुकिचं म्हणंत सांगितलं, मला नव्हतं वाटत की ती चापट त्याला मारावी, पण ती माझी प्रतिक्रिया होती. माझ्या ऐकण्यात आलं होतं की, त्या प्रसंगानंतर मी हिरो झालो होतो. मी त्याला चापट नव्हती मारायला पाहिजे. हे खरंच चुकिचं आहे आणि खरंच मी त्यासाठी स्वतःला दोषी मानतो.

अभिषेकने यावेळी मुनावर फारूकीच्या(Munawar Faruqui) विजयावरही प्रतिक्रिया दिली. त्याने असं स्पष्ट मत मांडलं की जर मुनावर व्यतिरिक्त कोणी हा शो जिंकलं असतं तर मला खुप वाईट वाटलं असतं. अभिषेकने मुनावरला हा शो जिंकल्याबद्दल शुभेच्छाही दिल्या. बिगबाॅसचा ग्रँडफिनाले काल सायंकाळी 6 वाजल्यापासुन ते रात्री 12 वाजेपर्यंत चालु होता. मुनावर फारूकी शोचा विजेता झाला तर अभिषेक कुमार फस्ट रनरअप आणि मन्नारा चोप्रा(Mannara Chopra) सेकंड रनरअप ठरली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘बिग बॉस’मधील टॉप 5 स्पर्धक होणार मालामाल, अंकिता लोखंडे तर आठवड्याला घेते तब्बल ‘एवढे’ लाख
बिगबाॅसच्या विजेत्याला मिळणार कार,होणार बक्षीसांचा वर्षाव, चला जाणुन घेऊया विनरच्या प्राइज मनीची रक्कम

हे देखील वाचा