Friday, November 22, 2024
Home मराठी शिव ठाकरे आणि वीणा जगतापचे झाले ब्रेकअप? शिवच्या ‘त्या’ उत्तराने रंगली चर्चा

शिव ठाकरे आणि वीणा जगतापचे झाले ब्रेकअप? शिवच्या ‘त्या’ उत्तराने रंगली चर्चा

बिग बॉस हा टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त विवादित असणारा शो आहे. या शोमधून अनेक कलाकार नावारूपाला येतात. अशातच बिग बॉस मराठी‌मध्ये देखील सुरू झाले आहे. या शोचे मराठीमध्ये तिसरे पर्व सुरू आहे. मागील दोन्ही पर्व चांगलेच गाजले आहे. मागील पर्वातील सगळे स्पर्धक एका पेक्षा एक अव्वल होते. सगळ्या स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात त्यांची खास जागा निर्माण केली होती. यातील शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि वीणा जगताप (Veena Jagtap) हे दोन स्पर्धक खूप चर्चेत आले होते. 

शिव आणि वीणा हे दोघेही रिलेशनमध्ये होते. याचा खुलासा त्यांनी बिग बॉसच्या घरात असताना नॅशनल टेलिव्हिजनवर केला होता. त्यांचे अफेअर चांगलेच गाजले होते. बिग बॉसच्या घरात असताना त्यांचा वावर, लव्ह स्टोरी, केमिस्ट्री सगळ्यांना खूप आवडली होती. दोघेही फिनालेपर्यंत गेले होते. शिव हा ‘बिग बॉस मराठी २’चा विजेता झाला होता. (Bigg Boss marathi 2 contestent veena jagtap and shiv thakare’s breakup)

बिग बॉसच्या घरात असताना शिवला हातावर वीणाच्या नावाचा टॅटू काढण्याचा टास्क आला होता. तेव्हा त्याने हातावर वीणा असे लिहिलेला टॅटू काढला होता. घरातून बाहेर आल्यावर देखील ते अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट होत होते. वीणा शिवच्या घरी देखील गेली होती. तसेच खास गोष्ट म्हणजे वीणाने देखील घरातून बाहेर गेल्यावर शिवच्या नावाचा टॅटू काढला होता. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. अशातच अशा बातम्या आहेत की, शिव आणि वीणाचे ब्रेकअप झाले आहे. वीणाने हातावरील शिवच्या नावाचा टॅटू हटवला आहे आणि तिथे एक पान काढले आहे.

तसेच याबाबत जेव्हा शिवला विचारले, तेव्हा त्याने या टॅटूबद्दल मला काही माहित नसल्याचे सांगितले सोबतच त्याने सांगितले की, “मी माझ्या कामामध्ये खुश आहे आणि ती तिच्या कामामध्ये खुश आहे. आमच्या दोघांवर बाप्पाची कृपा आहे.” त्यामुळे त्या दोघांमध्ये काहीतरी बिनसले आहे किंवा त्यांचे ब्रेकअप झाले असेल, अशी सर्वत्र चर्चा चालू आहे. कारण त्याने वीणाबद्दल जास्त बोलणे टाळले आहे.

शिव आणि वीणा दोघेही कलाकार आहेत. शिवने ‘स्प्लिटसविला’मध्ये काम केले आहे. तसेच नुकतेच त्याचे ‘शिलावती’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. तसेच वीणाने ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेत काम केले आहे. यासोबतच तिने ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत देखील काही काळासाठी मुख्य भूमिकेत काम केले आहे.

हेही वाचा :

अमिताभ बच्चनपासून ते अनुपम खेरपर्यंत ‘या’ कलाकारांचे अकाऊंट देखील झाले आहे हॅक

Laxmikant Berde। लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मृतीदिनानिमित्त वाचा खास लेख ‘आठवणीतील लक्ष्या’

विजय देवरकोंडाचा पहिला हिंदी चित्रपट लाइगर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, ३१ डिसेंबरला दिसणार सिनेमाची खास झलक

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा