विजय देवरकोंडाचा पहिला हिंदी चित्रपट लाइगर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, ३१ डिसेंबरला दिसणार सिनेमाची खास झलक


चित्रपटगृह सुरु झाल्यानंतर वेगवेगळ्या मोठमोठ्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर होत आहे. नुकतीच रणबीरच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. आता बहुप्रतिक्षित सिनेमातील ‘लाइगर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची देखील तारीख घोषित करण्यात आली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांचा ‘लाइगर’ हा सिनेमा सुरुवातीपासूनच खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विजय बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याने त्याचे फॅन्स त्याला चित्रपटात बघण्यासाठी आतुर झाले आहेत.

‘लाइगर’ सिनेमाच्या टीमने काही दिवसांपूर्वीच चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली. आता चित्रपटाचा निर्माता असणाऱ्या करण जोहरने ‘लाइगर’च्या प्रदर्शनाची तारीख त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केली आहे. करणने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, सोबतच एक फोटो देखील पोस्ट केला आहे. यत्यंने ‘लाइगर’ सिनेमा २५ ऑगस्ट २०२२ मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती देत. येत्या ३१ डिसेंबरला या सिनेमाची पहिली झलक दिसणार असल्याचे देखील सांगितले आहे. त्याची ही पोस्ट सर्वांसाठीच खूप आनंद देणारी आणि उत्सुकता वाढवणारी असली तरी चित्रपटासटाही मात्र जवळपास ८ महिने वाट पाहावी लागणार आहे.

करणने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, “या नवीन वर्षात आग लावू. एक्शन, ठरलेत आणि वेडेपणा. हे खूपच शानदार असणार आहे. तुमच्या नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात करण्यासाठी ३१ डिसेंबरला चित्रपटाची पहिली झलक दाखवली जाईल.” ‘लाइगर’ सिनेमाच्या शुटिंगचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जे पाहून स्पष्ट दिसले की, या टीमने शूटिंग करताना किती मजामस्ती केली आहे.

या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे विजय आणि अनन्यासोबत बॉक्सिंग चॅम्पियन माईक टायसन देखील चित्रपटात दिसणार आहे. अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणारा माईक पहिल्यांदाच कोणत्या बॉलिवूड चित्रपटात काम करताना दिसणार आहे. प्राप्त माहितीनुसार विजय आणि माईक रिंगमध्ये दोन हात करताना देखील दिसणार आहे.

‘लाइगर’ सिनेमाचे दिग्दर्शन पुरी जग्गन्नाथ यांनी केले असून, विजय या सिनेमात मार्शल आर्ट करणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. विजय, अनन्यासोबत या चित्रपटात विशु रेड्डी, अली, मकरंद देशपांडे देखील महत्वाच्या भूमिकेत दिसतील. हा सिनेमा हिंदी, मल्याळम, कन्नडा, तेलगू तामिळ आदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!