Saturday, July 27, 2024

Laxmikant Berde। लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मृतीदिनानिमित्त वाचा खास लेख ‘आठवणीतील लक्ष्या’

तो आपल्या सर्वांच्या आयुष्यात आला, त्याने मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकलं, तो आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी लढला आणि स्वतःच्या कलेच्या जोरावर त्याने सर्वांना जिंकून घेतलं. तो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच आपला  सर्वांचा लाडका लक्ष्या.

आज16 डिसेंबर म्हणजेच लक्ष्याचा 16 वा स्मृतिदिन. त्याने आपल्या अचूक कॉमेडी टायमिंगने प्रेक्षकांना हसता हसता वेड लावले होते. मराठी सोबतच हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाने सर्वाना भुरळ पडणाऱ्या लक्ष्याची अचानक एक्सिट सर्वाना चटका लावून गेली. या लेखातून आपण लक्ष्याच्या अभिनय प्रवासाची झलक बघणार आहोत. (Marathi Actor laxmikant berde death anniversary)

हेही वाचा – आतल्या गोटातील बातमी! नवरदेव विकीने नववधू अंकिताला दिलेले गिफ्ट पाहून म्हणाल, ‘बडी लोग, बडी बातें’

मुंबईच्या गिरगावात लहानाचा मोठा झालेला लक्ष्या कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्याने अनेक एकांकिकांमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. ‘टूर टूर’ हे त्याचे पहिलेच नाटक जबरदस्त हिट ठरले, आणि मराठीतला विनोदाचा बादशहाचा उदय झाला. मग लक्ष्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. ‘शांतेचे कार्ट चालू आहे’, ‘बिघडले स्वर्गाचे दार’, ‘कार्टी प्रेमात पडली’ अशा अनेक नाटकात काम केले.

1985साली आलेल्या ‘लेक चालली सासरला’ या चित्रपटातून त्याने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर आलेला ‘धुमधडाका’ हा लक्ष्याचा पहिला विनोदी सिनेमा ज्यातून त्याने हास्याचा धुमधडाका करत प्रेक्षकांच्या मनात नाव कोरले. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’, ‘दे दणादण’, ‘एकापेक्षा एक’, ‘भुताचा भाऊ’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘झपाटलेला’, ‘हमाल दे धमाल’, ‘धडाकेबाज’, ‘पछाडलेला’, ‘बजरंगाची कमाल’, ‘शेम टू शेम’, ‘शेजारी शेजारी’, ‘फेकाफेकी’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ आदी असंख्य चित्रपटांच्या माध्यामातून लक्ष्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

या हास्यसम्राटावर त्याच्या कॉमेडी भूमिकांमुळे अनेक वेळा टीका सुद्धा केली गेली. तेव्हा लक्ष्याने त्याच्या ‘एक होता विदूषक’ सिनेमातून टीकाकारांना सणसणीत उत्तर दिले. मराठीत अनेक नवनवीन रेकॉर्ड करत असतानाच, लक्ष्याने हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाची जादू दाखवली. सुरज बडजात्या यांच्या ‘मैने प्यार किया’ सिनेमातून लक्ष्याने हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला. या सिनेमात सलमान सोबत लक्ष्याही भाव खाऊन गेला.

त्यानंतर त्याने, ‘साजन’, ‘बेटा’, ‘अनाडी’, ‘तकदीरवाला’, ‘बेटी नं.1′, राजाजी’, ‘मासुम’, ‘त्रिनेत्र’, ‘जानम समझा करो’, ‘मेरी बीवी का जवाब नहीं’, ‘हम तुम्हारे हैं सनम’, ‘हम आपके है कौन’ अशा अनेक हिंदी चित्रपटातही काम केले. ‘हम आपके हैं कौन’ सिनेमातला ‘लल्लू’ आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. यासोबत लक्ष्याने छोटा पडदा देखील गाजवला.

हेही वाचा – पगडी हीच ओळख असणाऱ्या हर्षदिपला कौरला अमिताभ बच्चन यांनी दिली ‘सुफी की सुलताना’ ही पदवी

16 डिसेंबर 2004 ला हा विनोदाचा तारा कायमचाच निखळला. किडनी विकाराने लक्ष्मीकांत बेर्डेचे मुंबईत निधन झाले. त्याच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीसोबतच त्याचा फॅन्सलाही शोक अनावर झाला होता.

लक्ष्याच्या गेल्यानंतर इतक्या वर्षांनी आजही विनोद म्हटले की, फक्त लक्ष्याचा आठवला जातो. आजही तो प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे अढळ स्थान ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. अशा या चतुरस्र अभिनेत्याला दैनिक बोंबाबोंकडूनही भावपूर्ण आदरांजली.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
निवेदिता सराफ यांना आली लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आवडत्या डिशची आठवण, सांगितली खास गोष्ट
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ‘या’ चित्रपटात केले होते 1 रुपयात काम, वाचा संपूर्ण कहाणी

हे देखील वाचा