Saturday, July 6, 2024

प्रेक्षकांचे आभार मानत आदिश वैद्यने पुन्हा एकदा दणक्यात केली बिग बॉसच्या घरात एन्ट्री

बिग बॉस हा टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त चर्चेत राहणारा शो आहे. बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व जोरदार रंगात आले आहे. घरात टॉप ८ स्पर्धक उरले आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या ट्रॉफीच्या दिशेने प्रवास करताना सगळ्यांमध्ये चढाओढ चालली आहे. खेळाची काठिण्य पातळी वाढत आहे, नात्यांची समीकरणं बदलत चालली आहे. एकंदरीत घरात स्पर्धात्मक वातावरण तयार झाले आहे. अशातच बिग बॉसने या पर्वात एलिमिनेट झालेले स्पर्धक स्नेहा वाघ, आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई यांना घरात बोलावले आहे. त्यामुळे आता या खेळात नक्कीच कोणते तरी नवीन वळण येणार आहे.

अशातच या घरात येण्याआधी आदिश वैद्यने एक व्हिडिओ केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. आदिश वैद्य हा बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक होता. आदिश हा घरातील एक स्ट्रॉंग स्पर्धक होता. परंतु घरात आल्यानंतर तिसऱ्याच आठवड्यात तो घराबाहेर गेला. (Bigg Boss Marathi 3 : adish vaidya share a video to give thanks to audience)

त्याने आता शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो म्हणतो की, “मी घरात पुन्हा एकदा एन्ट्री करणार आहे. याआधी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद कारण तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे मला पुन्हा एकदा घरात एन्ट्री करण्याची संधी मिळाली आहे. मी जेव्हा घराबाहेर आलो तेव्हा तुम्ही सगळ्यांनी ब्रिंग बॅक आदिश असा हॅशटॅग ट्रेण्ड केला होता. त्यासाठी सगळ्यांचे आभार. मी असं म्हणालो होतो की, मला जर बिग बॉसच्या घरात जाण्याची परत संधी मिळाली आणि तेव्हा माझी इच्छा असली नसली तरीही तुमच्या प्रेमासाठी मी घरात जाईल. हे प्रेम असेच राहुद्या. काही चुका झाल्या तर मला माफ करा. जेवढे दिवस घरात असेल तेवढे दिवस मी नक्कीच तुमचे मनोरंजन करण्याच्या प्रयत्न करेल.”

आदिश जेव्हा घरातून बाहेर आलेला तेव्हा प्रेक्षकांना ते अजिबात आवडले नव्हते. तेव्हा सगळ्यांनी #bringbackadish असा हॅशटॅग ट्रेण्ड केला होता. त्यासाठी त्याने सगळ्यांचे आभार मानले आहे. तो परत घरात येणार आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. त्याने शेअर केलेल्या या पोस्टवर त्याचे अनेक चाहते त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच सगळे त्याला शुभेच्छा देत आहेत.

हे देखील वाचा