‘बिग बॉस मराठी’च्या घरात अनेक नव्या गोष्टी घडत आहेत. सगळेजण आता ट्रॉफीच्या दिशेने प्रवास करत आहेत. घरात आता आठ स्पर्धक राहिले आहेत. सगळेजण एकमेकांचे जवळचे मित्र असले, तरीही ते आता त्यांचा स्वतंत्र खेळ खेळत आहेत. बिग बॉसमध्ये दरवेळी कोणते ना कोणते पाहुणे येत असतात. अशातच ‘विजेता’ या चित्रपटातील कलाकार घरातील सदस्यांना भेट घेण्यासाठी येणार आहेत. घरात सुबोध भावे, पूजा सावंत, माधव देवचक्के आणि सुशांत शेलार हे कलाकार येणार आहेत.
घरात आल्यावर ते सगळ्यांचे वेगवेगळे खेळ घेतात आणि मनोरंजन करतात. घरातून आल्यानंतर अभिनेता आणि ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा स्पर्धक माधव देवचक्केने घरातील स्पर्धकांविषयी त्याचे मत व्यक्त केले आहे. (Bigg Boss Marathi 3 : bigg boss ex contestant madhav devchakke give his opinion about current contestant of BB)
त्याने सांगितले की, “आत जे आठ स्पर्धक राहिले आहेत ते सगळेच स्ट्राँग आहेत. ते खूप जिद्दीने खेळत आहेत. विशाल निकमच सांगायचं झाल्यास, तो समोरच्या टीमशी न भांडता स्वतः च्या टीमशी जास्त भांडतो. त्यामुळे तो कुठेतरी मागे पडतोय. विकास पाटील हा मास्टरमाईंड आहे आणि माझ्या मते तो टॉप ३ मध्ये असेल. मीनल शाह मला खूप लॉयल वाटते. सोनाली पाटील म्हणजे कोल्हापूरचा ठसका. तिला जर तिची मते योग्यरित्या मांडता आली, तर तिचा पुढचा प्रवास सोप्पा होईल.”
त्याने पुढे सांगितले की, “मीरा पहिल्या दिवसापासूनच मनोरंजन करते, ती पण टॉप ५ मध्ये जाईल असे वाटते. जय दुधानेबद्दल सांगायचे झाल्यास तो एक रियॅलिटी शो करून आलाय. त्यामुळे त्याला माहित आहे टास्क कसे खेळतात. परंतु लोकांना त्याचा स्वभाव रागिष्ट वाटतो. फक्त त्याने त्याच्या रागावर कंट्रोल केले, तर तो पुढे जाईल. गायत्रीला हाताला लागल्यामुळे या आठवड्यात खेळता आले नाही. आता बिग बॉसच्या घरात काय नवीन खेळ होत आहेत हे पाहणे औक्षुत्याचे ठरेल.”
अशाप्रकारे माधवने घरातील सदस्यांविषयी त्याचे मत व्यक्त केले आहे. नुकतेच बिग बॉसबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे या वर्षी बिग बॉस मराठीचा वाढता टीआरपी बघता शोच्या निर्मात्यांनी हा शो पुढे काही दिवस वाढवला आहे. या शोचा ग्रँड फिनाले २६ डिसेंबर रोजी होणार होता. परंतु आता हाती आलेल्या माहितीनुसार, हा शो जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा