Wednesday, January 15, 2025
Home मराठी ‘स्वतःच्या बुद्धीचा वापर तुला करताच येत नाही का?’ तृप्तीने बिग बॉसच्या चावडीवर शिवलीलाला मारला टोला

‘स्वतःच्या बुद्धीचा वापर तुला करताच येत नाही का?’ तृप्तीने बिग बॉसच्या चावडीवर शिवलीलाला मारला टोला

 

बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व चांगलेच जोमात चालले आहे. हाहा म्हणता या शोला एक आठवडा पूर्ण झाला सुद्धा. तिसऱ्या पर्वातील पहिला विकेंडचा डाव देखील चांगलाच रंगाला. विकेंडला मांजरेकरांनी सगळ्या सदस्यांची चांगलीच शाळा घेतली आहे. ज्या सदस्यांनी आठवडाभर चांगले काम केले त्यांचे मांजरेकरांनी कौतुक केले पण ज्यांनी चुकीची वागणूक केली त्यांची मात्र चांगलीच कानउघडणी झाली केली.

विकेंडच्या डावमध्ये सदस्यांनी खूप सुंदर गाणे सादर केले. यासोबत काम कानउघडणीचा खेळ झाला. या दरम्यान घरातील प्रत्येक सदस्याला इतर सदस्यांना सल्ला देण्यासही सांगण्यात आले. विशिष्ट सदस्याचा फोटो लावून त्याला दुसरा एक सदस्य सल्ला देत होता. या दरम्यान जेव्हा तृप्ती देसाई हिची वेळ आली तेव्हा तिने शिवलीला हिला चांगलाच सल्ल्याचा नावाखाली टोला मारला. (Bigg Boss Marathi 3 contestant trupti Desai give advice to shivleela patil)

तृप्ती देसाईवर जेव्हा वेळ येते तेव्हा ती शिवलीलाचा फोटो लावते आणि तिला सांगते की, “स्वतःच्या बुद्धीचा वापर तुला कधी करताचं येत नाही का गं? सतत कोणी सांगितलं तरच ऐकायचं. स्वतःचा विचार कर, स्वतःच्या बुद्धीचा वापर कर. तरच तू खऱ्या अर्थाने जिंकशील आणि पुढे जाशील.” यावर शिवलीला उत्तर देते की, “कसं आहे ना सर मला जिथे बोलायचं तिथे मी बोलतेच पण मी सर्वांचा मान राखून बोलते. कारण मी ज्या वातावरणात वाढले आहे, ज्या कुटुंबात वाढले आहे. त्या नुसार मी कोणाच्याही विचारत मधे बोलत नाही. मोठ्याने बोललं किंवा भांडणात बोललं तरच आपला विचार मांडला असं होत नाही.” तिच्या या बोलण्यावर सगळेच प्रभावित होतात.

शिवलीला या आठवड्यात जास्त कोणत्याच कार्यात सहभागी नव्हती. त्यामुळे तिला अनेकांनी ट्रोल केले. तसेच मागच्या आठवड्यात झालेल्या महिला विशेष आठवड्यात ती सर्वात वाईट मालकीण सिद्ध झाली आहे. त्यामुळे आता शिवलीलाची पुढची चाल काय असेल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

राज कुंद्रावर प्रश्न ऐकताच मीडियावर चिडली शिल्पा, म्हणाली ‘मी राज कुंद्रा आहे का?’

‘रेपिस्ट’ची प्रतिमा तयार झालेल्या रंजीत यांना लग्नासाठी मुलगी मिळणे झाले होते अवघड, मग…

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केलेल्या यश चोप्रा यांनी, शाहरुखसह अनेक कलाकारांना बनवले सुपरस्टार

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा