Tuesday, January 14, 2025
Home मराठी ‘सांग काम्या हो नाम्या’ कार्यात महिलांचे नखरे पुरवताना पुरुषांच्या नाकी नऊ, तर जय दुधानेला आले रडू

‘सांग काम्या हो नाम्या’ कार्यात महिलांचे नखरे पुरवताना पुरुषांच्या नाकी नऊ, तर जय दुधानेला आले रडू

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाचा पहिलाच आठवडा चालू आहे. पहिल्याच आठवड्यात टास्क पूर्ण करण्यात स्पर्धकांचे चांगलेच ‘तोते’ उडाले आहेत. या आठवड्यात घरात प्रवेश करतानाच महेश मांजरेकर यांनी सांगितले होते की, हा आठवडा महिला विशेष असणार आहे. घरातील वेगवेगळ्या भागाच्या महिला मालकीण असणार आहेत, तर पुरुष त्यांचे सेवक असणार आहेत. त्यामुळे सध्या घरातील सगळी कामे पुरुष मंडळीचं करत आहेत.

या आठवड्यात बिग बॉसने ‘चिव चिव चिमणी दार उघड’ हे साप्ताहिक कार्य स्पर्धकांना सोपवले आहे. यात महिलांना प्रभावित करण्यासाठी पुरुषांना वेगवेगळे टास्क करायचे आहेत. या खेळातील दुसरे कार्य ‘सांग काम्या हो नाम्या’ हे आहे. यामध्ये महिलांना पुरुष सदस्यांना त्या कामाला वैतागून नाही म्हटले पाहिजे. अशी कामे सांगायची आहेत. यात सगळ्या महिलांनी सहमताने विकास पाटील आणि जय दुधाने यांचे नाव सांगितले. यावर आता त्या दोघांना स्नेहा वाघ, तृप्ती देसाई आणि मीरा जग्गनाथ या महिला जे काही काम सांगतील ते करावे लागणार. मात्र, या तीन महिलांची कामे करता-करता विकास आणि जयच्या नाकी नऊ आले आहेत. (Bigg Boss Marathi 3 contestent week task, jay dudhane get cry for this reason)

एका महिलेने काम सांगितल्यावर दुसरी महिला लगेच बोलावून त्याला काम सांगत होती. त्यामुळे त्यांचा खूप गोंधळ झालेला दिसत आहे. स्नेहा जयला तिचा टॉवेल पूर्ण पाण्याने ओला करून सुकवायला सांगते, तर विकासला तिच्या चादरला इस्त्री करायला सांगते. इकडे तृप्ती देखील तिचे काम करण्यासाठी दोघांना बोलवत असते.

या सगळ्यात मीराने डाव साधून जयला बोलावले आणि त्याला सांगितले की, तिला संपूर्ण गार्डनमध्ये फिरायचे आहे. तेव्हा य तिजच्यासाठी घोडा बनतो आणि तिला पाठीवर बसून संपूर्ण गार्डनमध्ये फिरवतो. खूप वेळ होतो, पण मीरा काही त्याच्या पाठीवरून खाली उतरत नाही. शेवटी जयचे गुडघे दुखायला लागले आणि त्याने बिग बॉसला सांगितले की, तो हे कार्य करू शकत नाही. त्यामुळे पर्यायाने विकास या कार्याचा विजेता ठरला. परंतु झालेल्या सर्व प्रकाराचा जयला खूप त्रास झाला आणि तो रडू लागला. कारण त्याच्या या दरम्यान त्याच्या पायाला जखम झाली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हिना खानचं ‘मैं भी बर्बाद’ गाणं रिलीझ; अभिनेत्रीने अंगद बेदीसोबत दिले बोल्ड सीन

-‘बोल्ड सीनमुळे दिला होता खालच्या पातळीची महिला म्हणून टॅग’, मल्लिका शेरावतचा खुलासा

-असा क्रूर खलनायक, ज्याच्या नावात जरी ‘प्रेम’ असले, तरी चित्रपटांमध्ये ‘ते’ कधीही दिसले नाही

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा