‘बिग बॉस मराठी‘च्या तिसऱ्या पर्वातील आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या शोमध्ये अनेक रंगतदार गोष्टी घडल्या आहेत. या पर्वात आपल्याला अनेक अतरंगी स्पर्धक पाहायला मिळाले आहेत. अशातच घरातील जुने स्पर्धक स्नेहा वाघ, आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई यांची घरात पुन्हा एकदा एन्ट्री झाली आहे. घरात ते काही काळासाठी उपस्थित राहणार आहेत. या आठवड्यात घरात अनेक रंगतदार गोष्टी घडल्या आहेत. बाहेरून आलेल्या स्पर्धकांनी या आठवड्यात हुकूमशाही टास्क चांगलाच गाजवला आहे. अशातच घरात वीकेंडचा वार रंगला आहे. यावेळी मांजरेकरांनी घरात ज्यांनी चांगले काम केले त्यांचे कौतुक केले, तर ज्यांनी चुकीचे काम केले त्यांना खडेबोल सुनावले.
या वीकेंडला घरातील स्पर्धकांसाठी एक सरप्राईज असणार आहे. ते म्हणजे चावडीवर रविवारी अभिनेता सिद्धार्थ जाधव येणार आहे. त्यामुळे घरात चांगले वातावरण पाहायला मिळाले आहे. वीकेंडला अनेक गोष्टी घडत असतात. यातील एक महत्वाची आणि खास गोष्ट म्हणजे अतरंगी डिमांड. स्पर्धकांचे चाहते त्यांच्याकडे अतरंगी डिमांड करतात आणो त्या डिमांड त्यांना पूर्ण देखील कराव्या लागतात. अशीच एक अतरंगी डिमांड या आठवड्यात उत्कर्ष आणि जय यांच्या चाहत्याने केली आहे. त्या छोट्याशा चाहतीने त्या दोघांना लावणीवर डान्स करायला सांगितला. (bigg boss marathi 3 : fan demand jay and utkarsh to dance on lavani)
त्यावेळी जय आणि उत्कर्ष ‘वाजले की १२’ या लावणीवर डान्स करतात. त्यावेळी ते दोघे अत्यंत मजेशीर अंदाजात डान्स करताना दिसले आहेत. यावेळी घरातील सदस्य आणि स्टेजवर उभा असलेला सिद्धार्थ जाधव त्यांना चिअरअप करतात. त्यावेळी ते दोघेही मस्त डान्स करत असतात. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या आठवड्यात घरात शेवटचे कॅप्टनन्सी कार्य पार पडले आहे. यात मीनल शहा ही घरातील शेवटची कॅप्टन झाली. तसेच ती टॉप ५ फिनॅलिस्ट देखील झाली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना देखील खूप आनंद झाला आहे. तसेच आता घरात इतर कोण टॉप ५ मध्ये असणार आहे. याची सगळयांना आतुरता लागली आहे.
हेही वाचा :
- दक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूच्या आलिशान घराचे फोटो पाहिले का? ‘इतके’ कोटी रुपये आहे घराची किंमत
- माधुरी दीक्षित ते हरभजन सिंगपर्यंत, ‘या’ सेलिब्रिटींनी दिल्या सुपरस्टार रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
- प्रियांका चोप्रासोबतच्या नात्याबद्दल निक जोनासने उघड केली त्याची भावना; म्हणाला, ‘मला भीती वाटते की…’