Sunday, June 23, 2024

दक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूच्या आलिशान घराचे फोटो पाहिले का? ‘इतके’ कोटी रुपये आहे घराची किंमत

दक्षिणात्य अभिनेता महेश बाबू हा दक्षिण चित्रपट सृष्टीतील टॉप कलाकारांपैकी एक आहे. त्याने त्याच्या चमकदार लूक आणि दमदार अभिनयामुळे खूप नाव कमावले आहे. त्याचे चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतात. दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रियता मिळवलेला महेश बाबू आलिशान जीवन जगतो. त्याचे हैदराबादमध्ये एक आलिशान घर आहे जे स्वप्नातील घरापेक्षा कमी नाही. या घरात ते पत्नी नम्रता शिरोडकर आणि दोन मुलांसह राहतो. चला तर मग महेश बाबूच्या आलिशान घराची सुंदर फोटो पाहूया.

लॉकडाऊनच्या वेळी महेश बाबू (Mahesh Babu) आपल्या कुटुंबासह घरी उपस्थित होता. यादरम्यान त्याने आपल्या घराचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्याच्या घराची झलक पाहायला मिळते. ही महेश बाबूची लिविंग रूम आहे. फोटो पाहून ते किती अलिशान आहे याचा अंदाज येतो. घराच्या भिंतींवर लाकडी काम करण्यात आले आहे. तर लिविंग रूमचा मजलाही लाकडी दिसतो. लेदर सोफ्यावर लेटर टीव्ही पाहण्यात एक वेगळीच मजा आहे.

महेश बाबूच्या घरातील मंदिराचा हा फोटो आहे, यावरून त्याच्या कुटुंबाची देवावर किती श्रद्धा आहे, हे दिसून येते. मंदिर संगमरवरी दगडाचे आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, महेश बाबूच्या या घराची किंमत 60 कोटी आहे. या घरात त्याच्या प्रत्येक आवडीनिवडीची विशेष काळजी घेण्यात आली आहे.

महेश बाबूच्या घराचे इंटीरियर खूप खास आहे. घराची एक भिंत म्हणजे कौटुंबिक फोटोंची भिंत आहे. ज्यामध्ये संपूर्ण कुटुंबाच्या अनेक सुंदर आठवणी जपल्या गेल्या आहेत. महेश घरी असतो तेव्हा मुलांसोबत खूप मस्ती करताना दिसतो. सोशल मीडियावर मुलांसोबतचे व्हायरल झालेले फोटो याचा पुरावा आहेत. महेश बाबूच्या घरात वैयक्तिक होम थिएटर, जिम, बॅकयार्ड आणि मोठे गार्डन आहे.

घरामध्ये मोठ्या खिडक्या आहेत, जेणेकरून घरात नेहमी नैसर्गिक प्रकाश राहील. महेश बाबूच्या बागेतही बसण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जिथे तो अनेकदा आपल्या कुत्र्यांसोबत वेळ घालवतो.

हेही वाचा –
महेश बाबूला बॉलिवूड का परवडत नाही? शेवटी, या साऊथ सुपरस्टारची फी आणि नेटवर्थ किती? घ्या जाणून
हॉटनेसचा कहर! सनी लिओनीच्या हॉट फोटोंचा सोशल मीडियावर राडा

हे देखील वाचा