Monday, April 21, 2025
Home मराठी गायत्री दातारची ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून एक्झिट, ऐंशी दिवसांचा प्रवास पाहून झाली भावुक

गायत्री दातारची ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून एक्झिट, ऐंशी दिवसांचा प्रवास पाहून झाली भावुक

बिग बॉस मराठी‘ (Bigg Boss Marathi) च्या घरात अनेक नवीन गोष्टी घडताना दिसत आहेत. अशातच घरात वीकेंड पार पडला आहे. घरातून गायत्री दातार (Gayatri Datar) घरातून बाहेर पडली आहे. एकंदरीत ऐंशी दिवसापेक्षाही जास्त काळ तिने घरात घालवला आहे. अशातच या आठवड्यात ती घरातून बाहेत गेली आहे. त्यामुळे घरातील स्पर्धकांना आणि तिच्या चाहत्यांना खूप दुःख झाले आहे. या आठवड्यात गायत्री, मीरा, उत्कर्ष, सोनाली आणि जय हे स्पर्धक नॉमिनेट होते. परंतु कमी व्होट मिळाल्याने ती घरातून बाहेर गेली आहे.

या आठवड्यात सिद्धार्त जाधव हा होस्ट म्हणून आला होता. त्यामुळे या चावडीवर चांगलीच मजा आली आहे. त्याने स्पर्धकांचे खेळ घेतले आणि काही गप्पा गोष्टी देखील केल्या. शेवटी तो क्षण आला आणि घरातून गायत्रीची एक्झिट झाली. घरातील गायत्रीचा प्रवास तसा पाहायला गेला, तर खूपच छान होता. सुरुवातीच्या काही दिवसात तिची आणि मीराची मैत्री खूप चांगली होती. परंतु काही कारणांनी त्यांच्यात वाद झाले आणि गायत्री टीममधून बाहेर पडली. तिचे बी टीममधील सगळ्यांशी खूप चांगले जमायला लागले. नंतर मीरा आणि त्याच्यात जास्त वाद वाढत गेले आणि त्यांच्यातील अबोला जास्त झाला. बऱ्याचवेळा जय, उत्कर्ष, मीरा आणि गायत्रीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. (Bigg Boss Marathi 3 : gayatri datar exit from bb house)

काही दिवसांपूर्वी तिचा हात फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे जवळपास तीन आठवडे तिला खेळात येत नव्हते. याचा परिणाम तिच्या खेळावर आणि तिच्या चाहत्यांवर झाला. त्यामुळे तिला या आठवड्यात कमी व्होट मिळाले आणि ती घराबाहेर गेली. घरात तिची कामगिरी देखील उत्तम होती तसेच सगळ्यांशी मिळून मिसळून ती राहत होती. सोनाली आणि मीनलसोबत तिची खास मैत्री झाली होती.

अशातच घरातून तिची एक्झिट झाल्याने तिच्या चाहत्यांना खूप दुःख झाले आहे. अनेकांना ती फिनालेपर्यंत जावी अशी इच्छा होती. याआधी तिने ‘तुला पाहते रे’ या मालिकेत सुबोध भावेसोबत काम केले आहे. त्यानंतर तिची लोकप्रियता खूप वाढली. तिने त्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये देखील काम केले आहे.

हेही वाचा :

हरनाज संधूचा विजयी क्षण पाहून उर्वशी रौतेलाचेही अश्रू अनावर, व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

‘कोणा-कोणाच्या घरात आज न्यूजपेपर आला नाही,’ भन्नाट फोटोवर शालूचीच भन्नाट कमेंट

 मिस युनिव्हर्सचा ताज जिंकत इतिहास रचणाऱ्या हरनाज सिंधुबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहे का?

 

 

हे देखील वाचा