‘कोणा-कोणाच्या घरात आज न्यूजपेपर आला नाही,’ भन्नाट फोटोवर शालूचीच भन्नाट कमेंट


नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात, तर तुम्हा सर्वांना आठवतच असेल. तिच्या प्रीतीचा विंचू चावून जसा जब्या वेडा झाला त्याचप्रमाणे तिचे लाखो चाहते देखील वेडे झाले. आता मात्र तुमच्या लक्षात आलेच असेल की, आपण बोलत आहोत सर्वांच्या लाडक्या शालूबद्दल. अत्यंत साधीभोळी, दोन वेण्या घालून शाळेत जाणारी शालू म्हणजेच राजेश्वरी तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच बोल्ड आणि हॉट आहे. ती चित्रपटापेक्षा सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टवरूनच प्रचंड चर्चेत असते. नुकताच तिने आता तिचा एक फोटो शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर राडा घालत आहे.

राजेश्वरीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचा एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. मात्र हा फोटो नेहमीप्रमाणे नाही, तर वेगळ्याच स्टाईलच्या ड्रेसमधील आहे. राजेश्वरीने या फोटोत कोणताही डिझायनर ड्रेस परिधान केला नाही, तर चक्क न्यूजपेपरची डिझाइन असलेला ड्रेस तिने परिधान केला आहे. ज्यामुळे तिचा फोटो पाहून सर्वचजण थक्क झाले आहेत.

राजेश्वरीने फोटो शेअर करत कॅप्शन देखील दिले आहे. तिने लिहिले की, “सुंदर जगाला शुभ सकाळ” तिचा हा लूक आणि अदा चाहत्यांचे भान हरवत आहे. तिच्या या फोटोवर अनेक चाहते कमेंट करत आहेत. कोणी तिच्या लूकला ‘सुंदर’ म्हटले आहे, तर कोणी तिच्या ड्रेसला. तिच्या या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटातून २०१३ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटातील तिचे शालू हे पात्र खूप गाजले होते. या चित्रपटात ती अत्यंत साध्या पेहरावात दिसली होती. त्यानंतर तिने २०१७ साली ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. तसे पाहायला गेले, तर राजेश्वरीने जास्त चित्रपटात काम केले नाही. मात्र, कमी कालावधीत तिने चांगले नाव कमावले आहे.

हेही वाचा-

Video: माधुरी दीक्षितने ‘लेझी लॅड’ गाण्यावर दाखवले भन्नाट मूव्ह्ज, एक्सप्रेशन्सही आहेत कमाल!

कधी वाळवंट, तर कधी समुद्रामध्ये रोमान्स करताना दिसली अंकिता; रोमँटिक प्री-वेडिंग शूट आले समोर

दोन हजार रुपयांपासून कमाईला सुरुवात करणारे रजनीकांत आज आहेत ‘इतक्या’ कोटींचे मालक


Latest Post

error: Content is protected !!