Monday, January 19, 2026
Home मराठी मीरा जग्गनाथच्या अश्रूंचा फुटला बांध, गायत्री दातारला मिठी मारत मन केले मोकळे

मीरा जग्गनाथच्या अश्रूंचा फुटला बांध, गायत्री दातारला मिठी मारत मन केले मोकळे

बिग बॉसच्या घरात रोज नवनवीन काहीतरी घडताना प्रेक्षकाला पहायला मिळत आहे. भांडणं, मैत्री, प्रेम, राग, रुसवे यातून प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन होत आहे. जवळपास चोवीस दिवस झाले हे सर्व मंडळी एकत्र रात आहे. सुरुवातीला असणाऱ्या अनेक जोड्या आता बदलताना दिसत आहे. मनात एक आणि ओठावर एक अशी या घरातील सदस्यांची वागणूक असल्याने नक्की कोण खरे आणि खोटे हा प्रश्न नेहमीच सर्वांना पडताना दिसतो. जसकसे दिवस पुढे जात आहे, तसतसे सर्वच स्पर्धकांचे विविध रंगढंग समोर येऊ लागले आहेत.

या घरातील सदस्य असणाऱ्या मीराने अगदी पहिल्या दिवसापासूनच तिचा बिनधास्त, स्पष्ट स्वभाव सर्वांना दाखवला. मीराला अनेकदा महेश मांजरेकरांनी देखील खूप सुनावले. ‘बिग बॉस मराठी ३’च्या भरलेल्या पहिल्याच चावडीमध्ये महेश मांजरेकरांनी मीराला ‘दुसऱ्यांचे ऐकायला शिक’ म्हणत तिची शाळा घेतली होती.

मात्र, या सर्वांपेक्षा वेगळी मीरा नुकतीच बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. घराच्या गार्डन भागात मीरा आणि गायत्री बसलेल्या असतात तेव्हा मीरा गायत्रीसमोर तिचे मनं मोकळे करताना दिसते. समोर आलेल्या प्रोमोनुसार मीरा गायत्रीसमोर तिच्या मनातील खंत व्यक्त करणार आहे. ज्यामध्ये तिला अश्रू अनावर झाले, आणि तिचा बांध फुटला. मीरा गायत्रीसमोर ढसाढसा रडली. नक्की असं काय घडलं? कोणी मीराला दुखावालं? कोणाच्या वागण्याचे मीराला इतके वाईट वाटले असावे? मीरा गायत्री म्हणाली, “मला ऐकवायचे आहे… नाहीतर भांडायचे आहे… मला काहीतरी बोलायचे आहे, नाहीतर नाही होणार माझ्याकडून, माझ्या मनामधून नाही निघणार… नाही सहन होतं.

गायत्रीला मिठी मारत मीरा जोरजोरात रडते. तिला असे रडताना पाहिल्यावर प्रेक्षकांच्या मानत अनेक प्रश्न निर्माण होत आहे. मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला बिग बॉस पाहिल्यावरच मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बॅकलेस की टॉपलेस?’ नव्या आऊटफिटसह अवतरली उर्फी, तर ड्रेस पाहून चाहते पडले गोंधळात

-आर्यन खानला पुन्हा झटका! ‘या’ तारखेपर्यंत राहणार जेलमध्येच, तर व्हॉट्सऍप चॅट्समुळे वाढू शकतात समस्या

-अनन्या पांडेच्या घरी NCB अधिकारी, चौकशीसाठी अभिनेत्रीला समन्स

हे देखील वाचा