‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात दिवसेंदिवस रंगत येऊ लागली आहे. हा शो संपायला अवघे २०-२५ दिवस शिल्लक आहेत. परंतु खेळात नावीन्य आणि कठीणता वाढत चालली आहे. घरात आता जेमतेम ८ स्पर्धक राहिले आहेत. त्यामुळे सगळेच आता खूप चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. अशातच घरात आणखी काही सदस्यांची एन्ट्री झालेली पाहायला मिळणार आहे. हो! अगदी बरोबर ऐकलंत शो संपायला अवघे ३ आठवडे राहिले असताना घरात तीन स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे.
बिग बॉसच्या घरात तिसऱ्या पर्वातील एलिमिनेट झालेले स्पर्धक तृप्ती देसाई, स्नेहा वाघ आणि या शोमधील मधीली वाईल्ड कार्ड एन्ट्री स्पर्धक आदिश वैद्य एन्ट्री करणार आहेत. नुकतेच कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा प्रोमो समोर आला आहे. (Bigg Boss Marathi 3 : old contestant are enter in house)
या बिग बॉस सांगत आहेत की, घरात काही नवीन सदस्य येणार आहेत. यावेळी बिग बॉस सगळ्यांना फ्रिज करतात आणि एक एकाला घरात बोलावतात. यावेळी स्नेहा येते आणि जयला खूप बोलते. बाहेर जाऊन तिने सगळा शो पाहिला आहे. त्यामुळे तिच्याबाबत कोण काय बोलत होते याची माहिती तिला आली आहे. यावेळी ती म्हणते की, ‘जयने माझ्या भावनांचा, माझ्या मैत्रीचा आणि माझ्या या घरातील अस्तित्वाचा फायदा घेतला आहे.”
तसेच तृप्ती देसाई यांनी मीनल आणि विकास यांचे भरभरून कौतुक करतात. त्यामुळे आता हे स्पर्धक घरात किती दिवस राहणार आहेत? तसेच त्यांच्या येण्याने घरातील स्पर्धकांच्या खेळात काय बदल होईल हे बघण्यासाठी सगळे प्रेक्षक उत्सुक आहेत. तसेच येणारे एपिसोड बघण्यासाठी सगळे बिग बॉस प्रेमी उत्सुक आहेत.