‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये रूसवे फुगवे हे सुरूच असतात. आज मित्र असणारे तर उद्या जाऊन ते कधी एकमेकांचे शत्रू बनतात हे त्यांना देखील समजत नाही. घरात विशाल, सोनाली आणि मीनल यांची मैत्री खूप चांगली आहे. परंतु नुकतेच मीनल आणि विशालमध्ये वाद झाला आणि त्यानंतर त्यांच्यात अबोला निर्माण झाला. परंतु आता विशाल आणि मीनलचा अबोला काही संपायचं नावचं घेत नाहीये. टास्कनंतर झालेल्या बाचाबाचीमध्ये मीनल विशालला कानाखाली मारेन, मला हात नाही घाण करायचे असे बरेच काही बोलून गेली आणि तेव्हापासून दोघांमध्ये हा अबोला सुरू झाला.
आज मीनल, विशाल, विकास आणि सोनालीमध्ये यावरूनच चर्चा होताना दिसणार आहे. सोनाली विशालला म्हणाली, “सुरुवात तरी करा बोलायला.” यावर विशाल म्हणाला की, “पाया पडू तुझ्या.” सोनाली म्हणाली की, “ती पण करेल, तू पण काही मनामध्ये पकडू नकोस.” मीनल त्यावर म्हणाली की, “मला काही नाही बोलायला.” त्यावर विशाल म्हणाला की, “तू मीनल शाह आहे आणि मी विशाल निकम आहे. तुझं मनं खूप मोठं आहे, माझं नाहीये.” (Bigg Boss Marathi 3 : quarrel between Meenal Shah and Vishal nikam)
विकास म्हणतो की, “तू पण जे बोलास ते पण चुकीचे होते.” विशाल म्हणाला की, “मी काय चुकीचे बोलो?” विकास आणि सोनाली विशालला समजवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. ही सगळी चर्चा सुरू असताना मीनलला रडू कोसळले. बघूया हा अबोला कधी तुटणार ? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सलमान अन् राणीने ‘तेरी चुनरिया’वर केला जबरदस्त डान्स, चाहत्यांच्या आठवणी झाल्या ताज्या
-कंगना रणौतला पुरस्कार, पण तुमच्या नावाचा विचार का नाही झाला? पाहा या प्रश्नावर काय म्हणाला सोनू सूद
-मलायका अन् लहान मुलांची जबरदस्त बॉंडिंग, चिमुकल्याने गाल ओढताच अभिनेत्रीने मारली मिठी