‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या अनेक गोष्टी बदलताना दिसत आहे. अनेक जवळची नाती दुरावत आहेत. घरात सोनाली आणि विशाल यांची मैत्री संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यांची प्रत्येक गोष्ट सगळ्यांना खूप आवडते. परंतु सध्या त्यांच्या नात्यात कटुता निर्माण झाली आहे. आपापसात त्यांचे खूप गैरसमज झाले आहे.
मागे एकदा सोनालीने विशालला सांगितले होते की, तिला तो आवडतो. परंतु विशालने तिला तसे काही सांगितले नाही. त्यांच्यात सारखेच काही ना काही खटके उडत होते. अखेर या वीकेंडला त्यांच्या दोघांच्या मनातील राग बाहेर आला आहे. चावडीवर विशाल आणि सोनालीने एकमेकांवर अनेक आरोप केले. दोघे भांडत होते. तसेच काही दिवसांपूर्वी सोनालीने सांगितले होते की, तिला बॉयफ्रेंड आहे आणि तिचे लग्न ठरले आहे. यानंतर त्यांच्यात बरेच वाद झाले. (Bigg Boss Marathi 3 : trupti Desai give support to Vishal nikam)
या आठवड्यात विशालने सगळ्यांसमोर सांगितले की, सोनालीने त्याला सांगितले होते की, तिला तो आवडतो. तसेच त्याने सोनाली स्मोकींग करते असे देखील सांगितले. यानंतर त्यांच्यात खूप वाद झाले. आता सोशल मीडियावर सर्वत्र विशालला वाईट ठरवले जात आहे. तसेच काहीजण सोनालीला दोष देत आहेत.
https://www.instagram.com/p/CWx_HFVq9a5/?utm_source=ig_web_copy_link
अशातच बिग बॉस स्पर्धक तृप्ती देसाई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून विशालला पाठींबा दिला आहे. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीला लिहिले आहे की, “मी ५० दिवस विशालला जवळून पाहिले आहे. त्याचा स्वभाव खूप छान आणि रोखठोक आहे. परंतु तो बरंच काही सहन करत होता, जे त्याने पहिल्यांदा स्पष्टपणे सांगितले. सोनालीने वारंवार केलेला त्याचा अपमान आणि त्याला दिलेला त्रास हे आम्ही पाहिलंय. फक्त रडून आणि दरवेळी वूमन कार्ड वापरून सहानभूती मिळवणे म्हणजे बिग बॉसचा खेळ नव्हे. विशाल तू लढ मी तुझ्यासोबत आहे.”
त्यांनी केलेले हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण त्यांचे यावर मत व्यक्त करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती
-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत
-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा