Sunday, May 19, 2024

महेश मांजरेकर नव्हे आता ‘हा’ दिग्गज कलाकार होस्ट करणार ‘बिग बॉस मराठी सिझन ४’

मराठी ‘बिग बॉस’चे तीनही सिझन सुपरहिट ठरल्यानंतर लवकरच आता चौथा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधीचे तीनही सिझन अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या दमदार सुत्रसंचालनामुळे सुपरहीट ठरले होते. त्यामुळे प्रेक्षकांना आता कार्यक्रमाच्या चौथ्या सिझनची जोरदार उत्सुकता लागली आहे. तत्पुर्वी नुकतीच बिगबॉस मराठीचा चौथा सिझन महेश मांजरेकर होस्ट करणार असल्याची चर्चा रंगली होती. या चर्चांवर आता शिक्का मोर्तब झाले असून महेश मांजरेकरांच्या जागी नवीन अभिनेत्याचे नावही समोर आले आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, ‘मराठी बिगबॉस’चा सिझन ४ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधीचे सगळेच सिझन जोरदार चर्चेत राहिल्यानंतर नव्या सीझनमध्ये कोणते कलाकार गाजणार याचीच प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागली आहे. तत्पुर्वी बिगबॉस मराठीचे आत्तापर्यंतचे चारही सिझन गाजवलेले महेश मांजरेकर नव्या सीझनमध्ये मात्र दिसणार नसल्याचे निश्चित झाले आहे. महेश मांजरेकर यांचे तीन सीझनपर्यंतचेच कॉंन्टॅक्ट साईन केले होते. ते पुर्ण झाल्याने आता चौथ्या सीझनमध्ये ते दिसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

महेश मांजरेकर यांच्या जागी अभिनेता सिद्धार्थ जाधव कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिद्धार्थ जाधव सध्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारताना दिसत आहे. तसेच सिद्धार्थ मराठी प्रमाणेच हिंदी चित्रपटांमध्येही मोठ्या प्रमाणावर झळकताना दिसत आहे. त्यामुळेच महेश मांजरेकर यांच्याऐवजी आता सिद्धार्थ जाधव बिगबॉस मराठीचे सुत्रसंचालन करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. परंतु अभिनेता सिद्धार्थ जाधवकडून मात्र अद्याप याबाबतचे कोणतेही स्पष्टिकरण दिले नाही.

दरम्यान अभिनेता सिद्धार्थ जाधवचा अलिकडेच ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट चांगलाच चर्चेत आला होता. त्यानंतर आता सिद्धार्थ जाधव ‘दे धक्का’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ चित्रपटातही सिद्धार्थची भूमिका पाहायला मिळणार आहे. सिद्धूच्या चाहत्यांना या चित्रपटांची चांगलीच उत्सुकता लागली आहे.

हे देखील वाचा