Monday, September 25, 2023

चाहते असावे तर असे! ‘बिग बॉस’ विजेता बनताच 1001 गाड्यांचा ताफा अन् हजारोंच्या गर्दीकडून एल्विशचे जंगी स्वागत

सलमान खान होस्ट करणाऱ्या ‘बिग बॉस ओटीटी 2‘ला विजेता मिळाला. प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव ‘बिग बॉस ओटीटी 2’ शोचे हे विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, यासह तो ‘बिग बॉस’च्या इतिहासात वाईल्ड कार्ड एन्ट्री करून विजेतेपद जिंकणारा पहिलाच स्पर्धक ठरला. विशेष म्हणजे, जेव्हा विजेतेपद जिंकून एल्विश घरी पोहोचला, तेव्हा त्याचे जंगी स्वागत झाले. त्याच्या स्वागतासाठी 1001 गाड्यांचा ताफा सज्ज होता. कदाचित 1001 गाड्यांसोबत कोणत्याही सेलिब्रिटीचे स्वागत करण्याची ही पहिलीच वेळ असेल.

‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT 2) शोचा किताब जिंकून बाहेर पडताच एल्विश आर्मी (Elvish Army) सोशल मीडियावर सक्रिय झाली. त्यांनी व्हिडिओ आणि फोटोंचा पाऊस पाडला. अशात एल्विश यादव (Elvish Yadav) याच्या स्वागताचे व्हिडिओही जोरदार व्हायरल होत आहेत. विजेत्या एल्विशसाठी गुजरातहून 1001 गाड्यांचा ताफा निघाला होता.. एल्विश आर्मीने त्याचे जंगी स्वागत केले.

हजारो गाड्यांचा ताफा
एल्विश यादव याने ‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता बनल्यानंतर त्याच्या टीमने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या खास कार्यक्रमात लाखोच्या संख्येने चाहत्यांनी सहभाग नोंदवला होता. स्टार बनलेल्या एल्विशचे चाहते त्याच्यासाठी खूपच वेडे आहेत.

कार्यक्रमात एल्विश आर्मीची एन्ट्री
यापूर्वी बिग बॉसच्या फिनालेच्या दिवशीही एल्विशला वोट करण्यासाठी आणि विजेता बनण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथे लाखोच्या संख्येने सामील झालेल्या चाहत्यांनी एल्विशला विजेता बनवण्यासाठी जोरदार वोटिंग केली होती.

अखेरच्या 15 मिनिटात झाली 280 मिलियन वोटिंग
विजेता बनल्यानंतर एल्विश यादव याने म्हटले की, त्याला जिओच्या टीम हेडने सांगितले होते की, अखेरच्या 15 मिनिटात त्याच्यासाठी 280 मिलियन वोटिंग झाली होती. एल्विशने यासाठी आपल्या टीमला आणि लाखो चाहत्यांना धन्यवाद दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Elvish Raosahab (@elvish_yadav)

कोण आहे एल्विश यादव?
‘बिग बॉस ओटीटी 2’ विजेता बनल्यानंतर एल्विश सुपरस्टार बनला आहे. युट्यूब व्हिडिओजने रोस्ट करणाऱ्या या गुडगावच्या युवकाने इतिहास रचला आहे. आतापर्यंत बिग बॉसच्या इतिहासात कोणत्याही वाईल्ड कार्ड एन्ट्रीने शो जिंकला नाहीये. मात्र, आता एल्विशने ही कामगिरी करून दाखवली. घरात राहून त्याने मोठमोठ्या खेळाडूंना पछाडले. तसेच, घराबाहेर एल्विश आर्मीने त्याला पाठिंबा देण्यासाठी चांगलीच मेहनत घेतली. (bigg boss ott 2 winner elvish yadav grand welcome with 1000 car see video here)

महत्त्वाच्या बातम्या-
राजकीय पार्श्वभूमी लाभलेल्या घरातून आलीये मनीषा कोईराला, कर्करोगाने लावला करिअरला ब्रेक
‘या’ आहेत हिट सिनेमे देणाऱ्या मांजरेकरांबद्दल माहित नसलेल्या गोष्टी, महेश बाबूच्या पत्नीसोबत होतं अफेअर?

हे देखील वाचा