Monday, July 8, 2024

वयाच्या ४२ व्या वर्षी शमिताला हवीत २ मुलं; राकेशला म्हणाली, ‘मला मुलं पाहिजेत, पण…’

‘बिग बॉस ओटीटी’चे पर्व अगदी मजेत सुरू आहे. या शोच्या निमित्ताने करण जोहरने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले. करण पहिल्यांदाच या शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसला आहे. बिग बॉसबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूपच उत्सुकता असते. स्पर्धक, नवीन फॉरमॅट, नवीन वाद, नवीन किस्से आणि अनेक मसालेदार गोष्टी या शोमधून लोकांना पाहायला मिळतात. ‘बिग बॉस’च्या घरातील राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांच्या नात्याची सध्या खूप चर्चा सूरू आहे.

शमिता आणि राकेश यांचे नाते दिवसेंदिवस घट्ट होत चालले आहे. राकेशचे नाव ऐकले, तरी शमिता लाजते. दोघांमधील वाढत जाणारी सुंदर केमिस्ट्री चाहत्यांनाही खूप आवडत आहे. राकेश आणि शमितामध्ये खूप जवळचे नाते असल्याचे अनेक चाहत्यांना वाटत आहे. तसेच शमिता आणि राकेश एकमेकांसोबत छोट्या-छोट्या गोष्टी शेअर करत असतात. नुकताच झालेल्या भागात शमिता राकेशसोबत मुलांबद्दल बोलताना दिसली आहे.

शमिता सध्या ४२ वर्षांची आहे. ती म्हणाली की, “मला कधी-कधी वाटतं की, मलाही मुलं असावीत, पण परत वाटतं या वयात दोन मुलं. मग तुम्ही असं दुसऱ्या व्यक्तीवर अन्याय करू शकत नाही. मी माझी बहीण शिल्पाशिवाय राहू शकत नाही.” शमिताचा हा व्हिडिओ तिच्या एका चाहत्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना चाहत्याने लिहिले की, “शमिता आणि राकेश मुलांविषयी चर्चा करत आहेत, तर या दोघांचे रिलेशन खरं होत आहे.” राकेश आणि शमिता यांच्यातील प्रेम चाहत्यांनाही दिसत आहे. राकेश जेव्हा दिव्याशी बोलतो, तेव्हा शमिता प्रचंड रागावते. यावरून सगळे स्पर्धक राकेश आणि शमिताची खिल्ली उडवतात.

तर दुसरीकडे राकेशला बेघर होण्यापासून वाचवण्यासाठी शमिताने कुटुंबाने दिलेले पत्र न वाचता फाडले आणि स्वत: बेघर होण्यासाठी तयार झाली. याशिवाय, जेव्हा बिग बॉसने आपला पार्टनर बदलण्याची संधी दिली, तेव्हा शमिता स्पष्टपणे म्हणाली की, तिला राकेशशिवाय इतर कोणाशीही संबंध ठेवायचा नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनम कपूरने धोती आणि कुर्ता अशी केली पुरुषी वेशभूषा, वडील अनिल कपूर यांनी दिली प्रतिक्रिया

-‘बिग बॉस ओटीटी’वर निया शर्माचा जलवा; ‘वाईल्ड कार्ड’ म्हणून करणार एन्ट्री

-सलमानला पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते ‘इतके’ मानधन; आज एवढ्या पैशांमध्ये साधा स्मार्टफोनही नाही येत

हे देखील वाचा