Friday, November 22, 2024
Home अन्य ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये पुन्हा रंगला ‘या’ मुद्द्यावरून वाद; जो पाहून घरातील मुलांना वाटू लागली लाज

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये पुन्हा रंगला ‘या’ मुद्द्यावरून वाद; जो पाहून घरातील मुलांना वाटू लागली लाज

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू असलेला ‘बिग बॉस’चा हा हंगाम संपायला फक्त पाच दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक सदस्य प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. एकीकडे, जिथे या घरात प्रवेश करताच प्रत्येकाला स्वतःचे कनेक्शन मिळाले. तर दुसरीकडे दिव्या अग्रवाल सुरुवातीपासून या घरात एकटी राहिली आणि प्रत्येकांनी तिच्यावर निशाणा साधला. तसेच, दिव्या अग्रवाल आणि नेहा भसीन यांचा अगदी सुरुवातीपासूनच ३६चा आकडा आहे. पण अलीकडेच या दोघांमध्ये ‘घाणेरडी चड्डी’ संदर्भात मोठा वाद झाला. जरी हा मुद्दा कालांतराने संपला होता, परंतु आता पुन्हा एकदा हा मुद्दा घरात तापला आहे.

माध्यमांच्या प्रश्नांनी उपस्थित केला मुद्दा
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही मीडियाच्या लोकांना घराच्या आत जाण्याची संधी मिळाली. याच दरम्यान अनेकांनी त्यांना प्रश्न विचारले. माध्यमांनी नेहा भसीनच्या ‘घाणेरडी चड्डी’ चा मुद्दा उपस्थित करत दिव्या अग्रवालवर निशाणा साधला. नेहा भसीनने प्रथम निशांतला प्रश्न विचारला आणि सांगितले की, जेव्हा मीडिया याबद्दल बोलत होती तेव्हा तो हसत होता. जे तिच्यासाठी खूप विचित्र होते. इतक्यात दिव्या आली आणि नेहाला म्हणाली की, “तू इतरांच्या चड्डीबद्दल बोलतीस ते ठीक आहे.” (bigg boss ott divya agarwal and neha bhasin again fight over dirty unwashed underwear shamita shetty called her arrogant)

मुला -मुलींचा मुद्दा मांडला
खरं तर, प्रतीक नेहा आणि शमिता, दिव्या यांना म्हणाला होता की, “हे मुलींमधील प्रकरण आहे, अशा प्रकारे घरच्या मुलांना सांगणे अत्यंत चुकीचे आहे.” ज्याला दिव्या म्हणाली की, “मुलगा आणि मुलगी यात काही फरक नाही, हे कोणी सांगितले. हे मुलींबद्दल होते कारण ती मुलीची चड्डी होती. तुम्ही मुलाची चड्डी घेऊन कुणाच्या चेहऱ्यावर लावू शकत नाही.”

नेहा भसीनने दिव्याला दिला धक्का
नेहा भसीन आणि दिव्या अग्रवाल यांच्यात मोठा वाद झाला. बोलता बोलता दिव्या नेहाला मूर्ख म्हणाली. त्यानंतर नेहा भसीन दिव्यावर ओरडताना दिसली आणि तिने दिव्या अग्रवालला धक्का दिला. नेहा म्हणाली की, “तू मूर्ख आहेस, मला मूर्ख म्हणू नकोस.” यासोबतच, नेहा दिव्याला म्हणत होती की, ती लोकांमध्ये भेदभाव करते.

काय होता हा संपूर्ण मुद्दा
खरं तर दिव्या अग्रवाल आणि शमिता शेट्टी बाथरूम परिसरात होत्या. समोर वॉश बेसिनजवळ एक घाणेरडी चड्डी पडलेली होती. त्याला पाहून दिव्या शमिताला विचारते की, ती कोणाची आहे. त्यानंतर शमिता मूस जट्टानाला बोलवते आणि तिला विचारते. मूस ते पाहून म्हणते की, या ब्रँडची अक्षरा सिंग आणि नेहा भसीन घालते. तेवढ्यात नेहा भसीन तिथे येते आणि म्हणते की, ही तिची चड्डी आहे आणि ती तिथून उचलायला विसरली. नेहा माफी मागते आणि म्हणते की तिने ती धुण्यासाठी ठेवली होती. असा घडला होता प्रकार.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच की! ‘अरुदीप’ची नवं गाणं आलं रसिकांच्या भेटीला; त्यांच्या जुगलबंदीने पुन्हा केलं सर्वांना प्रभावित

-खास मित्रासह अंडरवॉटर मजा करताना दिसली ‘सोनू’; बिकिनी लूकने तर सर्वांनाच केलंय चकित

-ट्रेंडिंग गाण्यावर ‘स्वीटू’नेही धरला ताल, गोड अदा पाहून तुम्हीही व्हाल फिदा

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा