टीव्हीचा सर्वात वादग्रस्त रिऍलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’ आजकाल बराच चर्चेत आहे. शो आता त्याच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी, गायिका नेहा भसीन, प्रतीक सहजपाल, दिव्या अग्रवाल, मूस जट्टाना आणि निशांत भट्ट हे स्पर्धक फायनल शर्यतीत पोहचले आहेत.
या शोबाबत प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ आहे. यात सतत येणारे ट्विस्ट प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहतात. बिग बॉसच्या चाहत्यांची यादी बरीच लांब असली, तरी असेही अनेक कलाकार आहेत, ज्यांना हा शो खूप आवडतो. या कलाकारांपैकी एक म्हणजे सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी होय. काम्या फक्त या शोची प्रेक्षक नाही, तर या टीव्ही रिऍलिटी शोबद्दल तिने आपली मते ही उघडपणे मांडली.
याच दरम्यान टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीने अलीकडेच एक ट्वीट केले होते. त्या ट्वीटमध्ये तिने शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीची शाळा घेतली. इतकेच नव्हे तर तिने राकेश बापटवरुनही शमिता शेट्टीला खूप फटकारले आहे.
काम्याने तिच्या ट्वीटमध्ये लिहिले की, “तू बरोबर आहेस शमिता शेट्टी, राकेश तुझ्यासाठी योग्य व्यक्ती नाही. तुला अशा कोणत्या तरी व्यक्तीची गरज आहे, जो तुझ्या तालावर नाचू शकेल. राकेश अजिबात तसा नाही. आणि हो, तो जरा सुद्धा गोंधळलेला नाही. उलट, आता तो आणखी जास्तच हुशार होत चालला आहे.”
U are right #shamita @RaQesh19 is not the man for u, u want someone who can dance on ur beats.. Raqesh is definitely not the one! N yes he is not confused infact he seems to be more clear now. #BiggBossOTT @VootSelect
— Kamya Shalabh Dang (@iamkamyapunjabi) September 10, 2021
खरं तर, शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांचे सुरुवाती पासूनच कनेक्शन होते. त्या दोघांमध्ये एक घट्ट मैत्री दिसून आली. ज्याला नंतर एक प्रेम कनेक्शन म्हणून देखील पाहिले गेले. परंतु अलीकडेच शोच्या निर्मात्यांनी सदस्यांचे कनेक्शन संपवले आहे. तर आता सदस्यांना एकट्याने खेळण्याची संधी दिली आहे.
त्याच दरम्यान, कनेक्शन संपल्यानंतर राकेश हा शमितापेक्षा दिव्या अग्रवालच्या जास्त जवळ जाताना दिसून आला. याच कारणावरून शमिता शेट्टीने राकेश बापटवर निशाणा साधला. दिव्यामुळे त्यांच्या दोघांच्या नात्यात कटुता आली आहे. निर्मात्यांनी अलीकडेच शोचा एक प्रोमो प्रदर्शित केला. ज्यात राकेश बापट आणि शमिता शेट्टीमध्ये भांडणं होते. याच दरम्यान झालेल्या भांडणानंतर शमिता शेट्टी खूप दुःखी दिसत आहे. नेहा भसीनला तिच्या मनातील भावना सांगत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–सलमान खानच्या कुटुंबीयांनी वाजत गाजत दिला दिड दिवसाच्या बाप्पाला निरोप
–‘त्याच्याबरोबर’ प्रिया बापटने शेअर केला उमेश कामतसोबतच गोड फोटो, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
–‘क्या खूब लगती हो!’ सिंपल आणि स्वीट लूकमधील तेजस्विनी पंडितचे आकर्षक फोटो