Tuesday, July 9, 2024

‘मी शो सोडण्यास तयार आहे’, म्हणत राकेश बापटने मागितली बिग बॉस ओटीटी स्पर्धकांची माफी

‘बिग बॉस’ ओटीटी शो प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीचा शो बनला आहे. आता शो संपायला खूप कमी दिवस बाकी आहेत. अशा परिस्थितीत, घरातील स्पर्धक प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करण्यासाठी आणि ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. नेहमीप्रमाणे, शेवटच्या आठवड्यात देखील,‘बिग बॉस’ने कुटुंबातील सदस्यांना एक टास्क दिला. ज्यात प्रत्येक स्पर्धकाला आपापसात चर्चा करून आपले मत प्रेक्षकांसमोर मांडायचे होते. उर्वरित सदस्यांना देखील त्यावर आपले मत सांगून पसंती आणि नापसंतीचा टॅग द्यावा लागणार होता. पण राकेशने या टास्कमध्ये स्वतःचा निर्णय घेतला नाही.

राकेशने कोणताही निर्णय न घेतल्यामुळे, ‘बिग बॉस’ने हा टास्क रद्द केला. त्यामुळे कुटुंबातील उर्वरित सदस्यांना प्रेक्षकांच्या समोर आपले मत व्यक्त करण्याची संधी मिळाली नाही. यामुळे घरात उपस्थित असलेले सर्व सदस्य राकेशवर नाराज होताना दिसले. आपली चूक लक्षात येताच राकेशने केवळ शमिता शेट्टी आणि प्रतीक सहजपाल यांची माफी मागितली नाही, तर अनेक वेळा ‘बिग बॉस’चीही माफी मागितली.

चूक समजल्यानंतर राकेश म्हणाला की, “मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, मला दोघांचीही मते योग्य वाटली, पण माझ्यामुळे कुटुंबातील इतरांना शिक्षा होणे योग्य नाही” राकेश पुढे म्हणाला की, “मला वाटले की, हा एक टास्क आहे. ज्यात माझे मत व्यक्त केल्याने किंवा न केल्याने काही फरक पडत नाही. परंतु मला माहित नव्हते की, या टास्कमध्ये आपला निर्णय आपण घेणे आणि आपल्या आवडी-निवडी सांगणे फार महत्वाचे आहे. मला हा टास्क समजलाच नाही.”

https://www.instagram.com/p/CTmJbkRIhaF/?utm_source=ig_web_copy_link

या दरम्यान, राकेश ‘बिग बॉस’ला त्याच्या चुकीबद्दल इतर कोणालाही शिक्षा देऊ नका असे सांगताना दिसला. या त्यांच्या चुकीसाठी तो घराबाहेर जाण्यासही तयार आहे. ‘बिग बॉस’च्या निर्णयानंतर राकेश संपूर्ण वेळ स्वतःला दोष देत होता. तो शमिताला म्हणाला की, “मला खेळ समजत नव्हता, त्यामुळे मी हे घर सोडण्यासाठी तयार आहे.”

या दरम्यान, शमिता राकेशला समजावून सांगताना दिसली. ती राकेशला म्हणाली की, “तुझे मत प्रेक्षक समजून घेत आहेत. आता शोचा शेवट आला आहे. त्यामुळे तुझा घर सोडण्याचा निर्णय चुकीचा आहे.” त्याचवेळी शमिताने राकेशला मिठी देखील मारली.

‘बिग बॉस’च्या घरात राकेशवर याआधीही अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ‘बिग बॉस’च्या घरात राकेश बापटवर अनेकवेळा आरोप केले आहेत की, तो लोकांसमोर आपले मत मांडत नाही‌. तसेच तो घरात आपली भूमिका स्विकारत नाही. प्रतीकने त्याला स्पाइनलेस असेही म्हटले होते.

 

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा भारताबद्दल परदेशी होस्टने ऐश्वर्याला विचारला ‘हा’ प्रश्न; अभिनेत्रीनेही दिले होते सडेतोड प्रत्युत्तर

-‘एकेकाळी टॅक्सीमध्ये बसणे अभिमानाची गोष्ट होती’, अनिल कपूर यांनी ‘त्या’ दिवसांची काढली आठवण

-तब्बल ३० वर्षानंतर अजय देवगणने रिक्रिएट केला त्याचा ‘सिग्नेचर स्टंट’; ट्रकवर केली जबरदस्त ऍक्शन

हे देखील वाचा