Wednesday, July 3, 2024

Bigg Boss OTT : शमिता शेट्टी अन् राकेश बापट यांच्यामध्ये वादावादी, अभिनेत्रीने दिला डायपर घालण्याचा सल्ला

‘बिग बॉस’ हा टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय शो आहे. त्यातच ‘बिग बॉस ओटीटी’ प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडत आहे. या शोमध्ये सध्या अनेक ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. कनेक्शनबाबत या शोमध्ये असे अनेक प्रसंग समोर आले आहेत, ज्यामध्ये स्वतः स्पर्धक त्यांच्या कनेक्शनसोबत भांडले आहेत. नेहा भसीन तिचे कनेक्शन मिलिंद गाबा याच्यासोबत अनेकवेळा भांडली आहे. जिशन खानने त्याचे उर्फीसोबत असलेले कनेक्शन तोडून दिव्या अग्रवालसोबत कनेक्शन बनवले आहे.

घरात टास्कच्या वेळी देखील कनेक्शन आपापसात भांडताना दिसत आहेत. एका टास्क दरम्यान शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्यामध्ये जरा वादावादी झाली. शोच्या निर्मात्यांनी नुकतेच हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये शमिता शेट्टी राकेश बापटवर खूप चिडली होती. कारण राकेश टास्क दरम्यान टॉयलेटला गेला होता. यामुळे ती खूपच चिडली होती. अगदी तिने राकेशला डायपर घालण्याचा देखील सल्ला दिला. हे भांडण येवढ्यावरच नाही थांबले, तर शमिताचे हे बोलणे ऐकून राकेश बिग बॉसकडे डायपरची मागणी करतो. (Bigg Boss OTT Shamita Shetty anger on raqesh bapat actor demand diaper from bigg Boss)

समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये सुरुवातीला शमिता राकेशला म्हणते की, “तुझ्या आणि माझ्यामध्ये संवादाची खूप मोठी दरी आहे. हेच मी तुला समजावण्याचा प्रयत्न करत आहे.” यावर राकेशला काहीतरी म्हणायचे असते पण शमिता त्याचे बोलणे मधेच थांबवते आणि रागात म्हणते की, “सगळ्यात आधी तू टास्क चालू असताना जर वॉशरूममध्ये गेलास तर मी शप्पथ घेते (आवाज म्युट) माझ्याजवळ येईल.”

यावर राकेश हसून म्हणतो की, “मी माझा ब्लॅडर कंट्रोल नाही करू शकत. मी एक माणूस आहे. ही नैसर्गिक क्रिया आहे.” यानंतर शमिता मस्तीमध्ये म्हणते की, “तू येथे सुसु करायला, खायला आणि झोपायला आला आहेस का?” यावर राकेश म्हणतो की, “मला जायचे होते तर जाऊ नको का मी?? सगळे तर जातच होते ना.” मग शमिता म्हणाली की, “त्यांना टास्क चालू असताना जायला नव्हते पाहिजे.”

यानंतर शमिता पुन्हा एकदा राकेशला म्हणते की, एका संचालकाच्या रुपात त्यांच्यासाठी हे योग्य नव्हते. ती म्हणते की, “तुमच्या ब्लॅडरवर कंट्रोल ठेवा, डायपर घाला.” यावर उत्तर देत राकेश म्हणतो की, “काश त्यांच्याकडे डायपर असलं असत. मी पण एक घातलं असतं. बिग बॉस प्लीज मला डायपर पाठवून द्या.”

या शोमध्ये आता खूपच रंगत आली आहे. प्रेक्षक देखील शोला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लईच भारी! उर्मिला कोठारेनं सुंदर फोटो केले शेअर; दिसतेय एकदम बिनधास्त

-सारा- इब्राहिमपासून ते रणबीर- रिद्धिमापर्यंत ‘या’ बहीण- भावांच्या जोड्या आहेत खूपच प्रसिद्ध; एकमेकांवर ओवाळून टाकतात जीव

-लहानपणापासूनच होती अभिनयाची आवड; ‘तेरे नाम’नंतर उंचावला भूमिकाचा चित्रपटातील आलेख, आज आहे खूपच ग्लॅमरस

हे देखील वाचा