Wednesday, July 3, 2024

FIRनंतर एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘ओपन चँलेंज करतो जर मी…’

बिग बॉस विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याचा एल्विशवर आरोप आहे. गौरव गुप्ता नावाच्या व्यक्तीने एल्विश यादवसह 6 जणांवर गुन्हा दाखल केला. असा आरोप आहे की एल्विश यादव त्याच्या साथीदारांसह नोएडामध्ये रेव्ह पार्ट्या आयोजित करत असत आणि या पार्टीत बंदी असलेल्या सापाच्या विषाचा वापर केला जात असे. पार्टीत परदेशी मुलींना बोलवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आले आहेत.

विषारी साप आणि रेव्ह पार्टी प्रकरणी एल्विश यादव (Elvish Yadav) यांने आपली बाजू मांडली आहे. ट्विटवर व्हिडिओ शेअर करताना एल्विश यादव म्हणाला की, “मी सकाळी उठलो आणि पाहिले की संपूर्ण मीडियामध्ये माझ्या विरोधात कोणत्या बातम्या पसरवल्या जात आहेत. एल्विश यादव याला अटक करण्यात आली. अशातच एल्विश यादव ड्रग्जसह पकडला गेला आहे. माझ्याविरोधात अशा गोष्टी पसरवल्या जात आहेत. सर्व आरोप माझ्यावर होत आहेत. हे सर्व निराधार आहे.”

एल्विश यादव पुढे म्हणाला की, “मी यूपी पोलिस, संपूर्ण प्रशासन, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांना विनंती करेन, जर यात माझा एक टक्काही सहभाग आढळला तर मी जबाबदारी घेण्यास तयार आहे. मीडियाने माझे नाव खराब करू नये. जे काही आरोप होत आहेत त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. जर हे सिद्ध झाले तर मी त्याची जबाबदारी घेण्यास तयार आहे.”

खरंतर, शुक्रवारी सकाळी बातमी आली की उत्तर प्रदेशच्या नोएडा पोलिसांनी अलविशय यादवविरोधात एफआयआर नोंदवला आहे. यानंतर नोएडा पोलिसांनी सेक्टर 49 वर छापा टाकून 5 जणांना अटक केली. या छाप्यात पोलिसांनी 9 साप जप्त केले आहेत. यात पाच कोबरा, एक अजगर आणि दोन साप आहेत. पोलिसांनी पार्टीत 20 एमएल विषही हस्तगत केलं आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांनी चौकशीदरम्यान एल्विश यादवचे नावही घेतले होते. (Bigg Boss winner Elvish Yadav first reaction after FIR)

आधिक वाचा-
‘शुभविवाह’ मालिकेतील ‘भूमी’चं साडीतील सौंदर्य: पाहा फोटो
अक्षया देवधरची सिनेसृष्टीत एंट्री; ‘या’ चित्रपटात झळकणार अभिनेत्री

हे देखील वाचा