अभिनयाच्या जोरावर उर्वशी रौतेलाने प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. उर्वशी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांची कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. सध्या उर्वशी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशीच्या एका नवीन गाण्यातचा टीचर रिलीज झाला आहे.
या गाण्यात उर्वशीसोबत बिग ‘बॉस ओटीटी 2’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेला एल्विश यादव दिसत आहे. ट्रॉफी मिळवल्यानंतर त्याने इंडस्ट्रीज जबरदस्त यश मिळवले आहे. एल्विश आणि उर्वशीच्या रोमँटिक गाण्यातील म्युझिक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
‘हम तो दिवाने’ या गाण्यात उर्वशी आणि एल्विश रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहेत. ‘हम तो दिवाने’ या गाण्याचा टीचर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. काही तासातच या गाण्याला लाखो व्ह्युज मिळाल्या आहेत. एल्विशने सोशल मीडियावर एक पोस्ट करत स्वतःच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक गिफ्ट दिला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत असताना एल्विशने लिहिले की,“जन्मदिन हमारा, तोहफा आप सभी को,Systumm हिला दो, गाना आया है हमारा!” असे कॅप्शनमध्ये लिहीत पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टवर नेटकर्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. पोस्ट केलेल्या व्हिडिओ पाहून नेटकरी या जोडीचे भरभरून कौतुक करत आहेत.
View this post on Instagram
पोस्ट केलेले या व्हिडिओवर पूजा भट्टने देखील एक कमेंट केली आहे. कमेंट करताना लिहिले की, “ओह हो स्टार” तर उर्वशीने कमेंटमध्ये लिहिलं की “माझा हिरो” सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून त्यांच्या या गाण्याला चांगल प्रतिसाद मिळत आहे. ‘हम तो दिवाने’च्या टीझरला 2 मिलियनहून अधिक व्ह्युज आले आहेत. उर्वशी आणि एल्विशचे हे गाणं 14सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. (BB OTT 2 winner Elvish Yadav and actress Urvashi Rautela Hum To Diwane teaser released)
अधिक वाचा-
–आता ‘गदर 2’ शाहरुख खानच्या ‘जवान’वर पडणार भारी! 33व्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई
–नाद करा पण आमचा कुठं! शाहरुखच्या ‘जवान’ला टक्कर देत ‘ड्रीम गर्ल 2’ने केली तब्बल 100 कोटींची कमाई