Thursday, March 13, 2025
Home मराठी काव्या निघाली भलतीच कावेबाज! यामुळे घरच्यांसोबत रचला होता बेपत्ता झाल्याचा कट, नेटकऱ्यांमध्ये संताप

काव्या निघाली भलतीच कावेबाज! यामुळे घरच्यांसोबत रचला होता बेपत्ता झाल्याचा कट, नेटकऱ्यांमध्ये संताप

गेल्या काही दिवसांपूर्वी लोकप्रिय युट्यूबर आणि रिलस्टार बिंधास्त काव्या अचानक बेपत्ता झाल्याने सोशल मीडियावर जोरदार खळबळ माजली होती. काव्याच्या आई वडिलांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत मुलगी बेपत्ता झाल्याचे सांगितले होते. या बातमीने तिच्या चाहत्यांसह अनेकांना धक्का बसला होता. पण त्यानंतर दोनच दिवसात काव्या सापडल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र आता या संपूर्ण प्रकरणाची दुसरी आणि धक्कादायक बाजू समोर आली असून नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. 

याबाबत संपूर्ण बातमी अशी की, औरंगाबाद शहरातील लोकप्रिय युट्यूबर बिंधास्त काव्या 10 सप्टेंबर रोजी अचानक गायब झाल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणाची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली होती. मात्र काही तासातच काव्याला मध्यप्रदेशमधून ताब्यात घेण्यात आले. या घटनेनंतर तिच्या आई वडिलांनी अभ्यासावरुन रागावल्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले होते. मात्र आता या प्रकरणात नवीनच खुलासा झाला असून फक्त प्रसिद्धीसाठी तिच्या घरच्यांनी हा कट रचल्याचे उघड झाले आहे.

परंतु, आता या मिसींग प्रकरणात काहीही तथ्य नसून हे काव्या आणि तिच्या कुटुंबीयांनी केलेला बनाव असल्याचे खालच्या पातळीवर जाऊन दर्जाहीन प्रसिद्धीसाठी हे कृत्य केलं गेलं असल्याची माहिती बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा आशा शेरखाने-कटके यांनी दिली आहे. बिंदास काव्या बेपत्ता होणं हे काव्या आणि तिच्या कुटुंबियांनी ठरवून केले होते. काव्या आणि तिच्या कुटुंबाने केवळ फॅन फॉलोअर्स वाढवण्यासाठी काव्या बेवत्ता असल्याचे भासवले असल्याचे समोर आले आहे. घरच्यांवर नाराज होऊन ती घरातून निघून गेली असल्याचे शुल्लक कारण काव्या परतल्यावर तिच्या घरच्यांनी सांगितले होते. मात्र तो सगळा बनाव होता. अशी माहिती समोर आली आहे. या समोर आलेल्या बातमीने नेटकरी तसेच तिच्या चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- अली-ऋचाच्या लग्नात येणार परदेशी पाहुणे, ‘हे’ दिग्गज हॉलिवूड कलाकार लावणार हजेरी
‘या’ अभिनेत्रींनी गाजवल्या देवींच्या भूमिका, अक्राळविक्राळ रुपे पाहून प्रेक्षकांचाही उडाला थरकाप
‘खतरों के खिलाड़ी 12’ l अभिनेत्रीचा खतरनाक स्टंट पाहून पूजा हेगडेची उडाली भितीने गाळण, व्हिडिओ व्हायरल

 

हे देखील वाचा