Thursday, March 28, 2024

अली-ऋचाच्या लग्नात येणार परदेशी पाहुणे, ‘हे’ दिग्गज हॉलिवूड कलाकार लावणार हजेरी

बॉलिवूडमध्ये अशी अनेक प्रसिद्ध स्टार कपल्स आहेत, ज्यांच्या लग्नासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. बी-टाऊनच्या याच जोडप्यांपैकी एक म्हणजेच अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री रिचा चढ्ढा त्यांच्या लग्नाच्या बातम्यां बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे स्टार कपल या वर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या येत आहेत. दरम्यान, आता त्यांच्या लग्नाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे.

अली फजल (Ali Fazal) आणि रिचा चड्ढा (Richa Chaddha) दाेघांच्या लग्नाच्या विधी 30 सप्टेंबरपासून सुरू हाेणार आहेत, तर 6 ऑक्टाेबरला दाेघे लग्नबंधनात अडकणार आहेत. हेच कारण आहे की, दाेघे लग्नाच्या विधीसाठी लवकरच दिल्लीला जाणार आहेत. यादरम्यान मुंबईला आयाेजित केलेल्या रिसेप्शनसाठी हॉलिवूड मधील मित्र परिवार येणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘विक्टोरिया एंड अब्दुल’मधील अलीची काे-स्टार अभिनेत्री जूडी डेंच आणि जेरार्ड बटलर यांना देखील आमंत्रीत केलं आहे. याव्यतिरिक्त अलीने आगामी हाॅलीवूड चित्रपट ‘कंधार’ यातील काेस्टारला देखील लग्नाचे आमंत्रन दिलं आहे.

लग्न साेहळ्यात ‘नाे फाेन पाॅलिसी’
या लग्न साेहळ्यात ‘नाे फाेन पाॅलिसी’ ठेवण्यात आली नाही. फक्त एक छाेटीशी अट आहे, ते म्हणजे पाहुणे लग्नाचे फाेटाे काढू शकणार नाहीत. ही अट मान्य असल्यास ते फाेन आणू शकतात. माध्यमांतील वृत्तांनुसार, असे सांगितले जात आहे की, हा निर्णय यासाठी घेतला गेला. कारण, पाहुणे कुठलीही चिंता न करता आनंदाने लग्न एन्जॉय करू शकतील. जाेडप्यांची इच्छा आहे की, या साेहळ्यात उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांची विशेष काळजी घ्यावी.

बाॅलिवूड व्यतिरिक्त हाॅलिवूडमध्ये केलं अली फजलने काम
अली फजल (Ali fazal) याच्या वर्कफ्रंटविषयी बाेलायचे झाले, तर त्याने ‘थ्री इडियट्स’सारख्या चित्रपटातून छाेटीशी भूमिका साकारत करिअरला सुरुवात केली हाेती. अली फजल अनेक दमदार चित्रपटांमध्ये दिसला आहे. अलीने बाॅलिवूड व्यतिरिक्त हाॅलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचे काैशल्य दाखवले आहे. ‘फ्यूरियस 7’, ‘विक्टोरिया’ आणि ‘अब्दुल’ हे त्याचे मुख्य हॉलिवूड चित्रपट आहेत

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रेमासाठी कायपण! लग्न करण्यासाठी मध्यरात्री पळून गेली होती अर्चना पुरण सिंग

तुषार कालिया ठरला ‘खतरों के खिलाडी १२’चा विजेता, ट्रॉफी कारसह मिळाली ‘एवढी’ रोख रक्कम

हे देखील वाचा