स्मिता पाटील यांनी आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत भलामोठा चाहतावर्ग कमावला आहे. त्या एक अभिनयपूर्ण, चाणाक्ष, अफाट बुद्धिमत्ता, तसंच शिकाऊ वृत्ती असलेल्या अभिनेत्री होत्या. १३ डिसेंबर १९८६ रोजी त्यांचे अकाली निधन झाले. या गोष्टीचा सर्वात मोठा धक्का हा त्यांच्या कुटुंबियांना बसला होता. सिनेसृष्टीने एक ध्रुव तारा गमावलाच होता. परंतु त्याहीपेक्षा काही वाईट झालं असेल, तर फक्त दोन आठवड्यांच्या प्रतिक बब्बरने त्याची आई गमावली होती. आज (१७ ऑक्टोबर) स्मिता यांचा जन्मदिवस असतो. मागच्या वर्षी प्रतिकने त्याच्या आईच्या स्मृतीदिनी इंस्टाग्रामवर एक भावुक पोस्ट टाकली होती, जी आता सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.
प्रतीक बब्बरने आपल्या आईचा फोटो शेअर करत लिहीलं होतं की, ‘३४ वर्षांपूर्वी याच दिवशी आई आम्हाला सोडून निघून गेली. एवढ्या वर्षात माझी आई नक्की कशी असेल याची छबी मी माझ्या मनात निर्माण केली आहे. माझी आई एक परिपूर्ण स्त्री होती. एक पर्फेक्ट महिला…एक पर्फेक्ट रोल मॉडल. प्रत्येक लहान मुलीला तिच्याकडे बघून तिच्यासारखंच व्हावसं वाटेल अशी ती होती.’
‘माझी आई एक अशी स्त्री होती जी आई म्हणून आपल्या मुलाला कधीच एकटं पडू देणार नाही. मनाने ती अजूनही माझ्यासोबत असते. माझी आई दरवर्षी माझ्याप्रमाणेच तरुण होते. आताही ती 65 वर्षाची तरुणी आहे. माझ्या मनामध्ये ती कायमच जिवंत राहील. माझी आई माझ्यासाठी प्रचंड महत्वाची व्यक्ती आहे. ती माझ्यासाठी सुपर लेजेंड आहे.’
फक्त दोन आठवड्यांच्या या बाळाने त्याच्या आईला असं किती ते पाहिलं असणार? त्याच्या नशिबी आईचा पान्हा आला तोदेखील फक्त दोन आठवड्यांचाच… त्याची आई ही नेहमी तिच्या कालाकृतींमधून त्यांच्यापर्यंत पोहचत राहिली. वडील राज बब्बर यांच्या आठवणींमधून त्याला तिची माया जाणवली असेल. या सगळ्याची जाणीव प्रतिकला असल्याचं आपल्याला या त्याच्या पोस्ट मधून दिसून येतं.
काही वर्षांपूर्वीच नुकतंच राज बब्बर यांनी प्रतिकचं लग्न देखील लावून दिलं आणि आपला पितृधर्म पाळला. त्यासमयी देखील त्याला त्याच्या आईची आठवण आली असणार हे काही वेगळं सांगायला नको.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-…आणि मरण्यापुर्वी स्मिता पाटील यांनी सांगितली होती ‘ती’ अनोखी शेवटची इच्छा.! काय होती ती इच्छा!
-हॅपी बर्थडे स्मिता पाटीलः स्मिता पाटील यांच्या ५ अविस्मरणीय भूमिकांना आज देऊयात उजाळा