Saturday, March 2, 2024

अल्प आयुष्यामुळे स्मिता पाटील यांच्या ‘या’ तीन इच्छा राहिल्या अपुऱ्याच; पाहा काय होती त्यांची स्वप्ने

स्मिता पाटील या बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहेत. जरी त्यांनी नकळतपणे अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं असेल, पण त्यांनी या क्षेत्रात स्वत:ला पूर्णपणे झोकवून दिलं होतं. याची झलक आपल्याला त्यांच्या चित्रपटात पाहायला मिळतेच. पण तुम्हाला माहिती आहे का, या अभिनेत्रीची कधी काळी पाहिलेली स्वप्ने दुर्दैवाने अपूर्णच राहिली. आज (१७ ऑक्टोबर) त्यांची जयंती आहे. यानिमित्ताने त्यांच्या अपुऱ्या राहिलेल्या स्वप्नांबद्दल जाणून घेऊयात.

आईला मोठा बंगला करायचा होता गिफ्ट
स्मिता यांच्या आई विद्याताई पाटील यांची लग्नानंतर फारच फरफट झाली. फारच हालाखीचे दिवस होते. जेव्हा स्मिता यांचा जन्म झाला, तेव्हा त्यांना नाईलाजास्तव हॉस्पिटलमध्ये नर्सचं काम करावं लागलं. स्मिता या जेव्हा लहानपणी त्यांच्या आईला इतकी मेहनत करताना पाहत असत, तेव्हा त्या म्हणत की, ‘जेव्हा मी मोठी होईन तेव्हा मी तुला खूप सारे पैसे कमवून देईन.’ इतकंच नाही तर विद्याताईंना वृक्षलागवडीची फार आवड त्यामुळे स्मिता या त्यांच्या मातोश्रींसाठी एक गार्डन असणारा बंगलाच आई विद्याताईंना गिफ्ट करणार होत्या. (ultimately smita patils these three wishes were left undone)

दिग्दर्शन करण्याचा होता त्यांचा मानस
थोर दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्यासोबत आपल्या कारकिर्दीची सुरुवात स्मिता पाटील यांनी केली. त्यांच्या अभिनय कौशल्याची स्तुती करताना बेनेगल साहेबांना कधीच शब्द अपुरे पडत नसत. परंतु ते स्मिता यांच्या आणखी एका गुप्त कौशल्याबद्दल देखील बोलत असत. ते नेहमी म्हणायचे की, ‘स्मिताचा अभिनयात तर हातखंडा आहेच परंतु तिच्या कडे दिग्दर्शकाची पारखी नजर देखील आहे. तिला दिग्दर्शन प्रक्रियेची उत्तम जाण आहे.’

स्मिता यांची देखील हीच इच्छा होती. परंतु पुढील काही वर्षे त्या अभिनयात इतक्या रमून गेल्या की त्यांना दिग्दर्शनासाठी वेळच नाही मिळाला. परंतु राज यांच्या सोबत लग्नानंतर आणि प्रतीक बब्बर या त्यांच्या मुलाच्या जन्मानंतर त्या राज बब्बर याना घेऊन एक सिनेमा करणार होत्या आणि त्या सिनेमाचं दिग्दर्शन खुद्द स्मिता पाटील करणार होत्या. पण म्हणतात ना, ‘आले देवाजीच्या मना तेथे कुणाचे काय चालेना!’ अशाप्रकारे त्यांची हीदेखील इच्छा अपूर्णच राहिली.

फार आवडायचा लहान मुलांचा सहवास
स्मिता यांना लहान मुलं फार आवडायची. त्यामुळेच तर त्यांच्या गरोदरपणात त्या मित्र मैत्रिणींना सर्वांना सांगायच्या की,’मी एका मुलावर थांबणार नाहीये.’ त्यांना मुलांची टोळी हवी होती. परंतु प्रतीक बब्बरचा जन्म झाला आणि काही दिवसांनी स्मिता पाटील यांनी या जगाचा अचानक निरोप घेतला. आणि स्मिता यांचं ही देखील इच्छा अपूर्णच राहिली. प्रतीक बब्बर याचं काही वर्षांपूर्वीच लग्न झालं. आणि आईला भरपूर मिस करतो, असंही तो कायम म्हणत असतो.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-…आणि मरण्यापुर्वी स्मिता पाटील यांनी सांगितली होती ‘ती’ अनोखी शेवटची इच्छा.! काय होती ती इच्छा!

-हॅपी बर्थडे स्मिता पाटीलः स्मिता पाटील यांच्या ५ अविस्मरणीय भूमिकांना आज देऊयात उजाळा

-विवाहित असूनही राज बब्बर पडले होते ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात; पुढे अशाप्रकारे थाटला होता संसार

हे देखील वाचा