दिवंगत अभिनेत्री रिमा लागू (Reema Lagoo) यांचे नाव ऐकले की मायेने, प्रेमाने भरलेला एक चेहरा सर्वांच्याच डोळ्यासमोर येतो. आपल्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी त्यांच्या सहजसुंदर अभिनयाची झलक दाखवली होती. त्यामुळेच त्यांना बॉलिवूडची माता म्हणूनही ओळखले जाते. मराठी, हिंदी मालिका तसेच चित्रपटातही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. मंगळवार( २१,जून) रिमा लागू यांची जयंती. जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील एका कधीही न ऐकलेल्या किस्स्याबद्दल.
रंगभूमीतून करिअरची सुरुवात करणाऱ्या रीमा यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी टीव्हीवरही अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 21 जून 1958 रोजी जन्मलेली रीमा लागू चित्रपटांमधील आईच्या भूमिकेसाठी ओळखल्या जातात. त्यांच्या आयुष्यातील असाच एक किस्सा म्हणजे त्या एका फोटोग्राफरसाठी त्या देवदूत बनल्या होत्या. रीमा लागू यांनी आपल्या मुलाला केवळ पडद्यावरच नाही तर वास्तविक जीवनातही स्वतःच्या बळावर वाढवले आणि समाजात आपले मान उंचावत एक वेगळी ओळख निर्माण केली.
रीमांची लागू यांची आईदेखील एक मराठी अभिनेत्री होती, त्यामुळे त्यांच्यापासूनच रीमांचा कलही अभिनयाकडे होता. दहावी पास होताच त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्री असलेल्या रीमा यांनी 1980 मध्ये ‘कलयुग’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अभिनयादरम्यानच रीमा लागू यांची मराठी अभिनेते विवेक लागू यांच्याशी मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि शेवटी लग्न झाले. त्यांना मृण्मयी लागू ही मुलगी आहे. काही दिवस रीमा-विवेकचे वैवाहिक जीवन सुखी होते, पण नंतर असा दुरावा निर्माण झाली की दोघेही वेगळे झाले. त्यानंतर त्यांनी आपले उर्वरित आयुष्य आपल्या मुलीच्या संगोपनात घालवले.
सुप्रसिद्ध फोटोग्राफर आशिष सोमपुरा यांनी मुलाखतीत सांगितले होते की, “रीमा दीदींचा पोर्टफोलिओ 1985 मध्ये शूट झाला होता. तेव्हा मी नवीन होतो आणि त्या एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या, तरीही माझ्या पोर्ट्रेटसाठी माझ्यासारख्या नवीन फोटोग्राफरकडून त्यांनी शूट केले. माझ्या छोट्या स्टुडिओमध्ये काही फोटो क्लिक केल्यानंतर, मी त्यांना आउटडोअर शूटसाठी विचारले आणि त्या शूटने मला नशीब दिले. यानंतर अभिनय आणि मॉडेलिंगशी संबंधित अनेक कलाकार माझ्या स्टुडिओत येऊ लागले.”
आशिष सोमपुरा पुढे म्हणाले, “माझ्या मुलीचा पोर्टफोलिओ क्लिक केल्यानंतर अनेक वर्षांनी मला आठवण करून दिली की त्यावेळी तुम्ही फक्त 600 रुपये घेतले होते. मी म्हणालो मला तुझ्याकडून एक रुपयाही नको कारण तू माझ्यासाठी देवदूत बनून आली आहेस आणि तुझ्या फोटोंंमुळेच माझे संपुर्ण आयुष्य बदलले आहे.” अशा प्रकारे अभिनेत्री रिमा लागू यांच्या एका फोटोमुळे त्या फोटोग्राफरचे नशीब बदलेले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
- हेही वाचा-
- Raksha Bandhan | थीमपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे अक्षयचा ‘रक्षा बंधन’, ट्रेलर आणेल तुमच्या चेहऱ्यावर हास्य
- ‘पुष्पा २’ मध्ये होणार रश्मिकाचा मृत्यू ? खुद्द चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला ‘हा’ महत्वाचा खुलासा
- वरुणराजाच्या प्रतिक्षेत व्याकुळ झालेल्या मुलांची ह्रदयस्पर्शी कथा, जाणून घ्या ‘येरे येरे पावसा चित्रपटाबद्दल