Thursday, April 25, 2024

‘पुष्पा २’ मध्ये होणार रश्मिकाचा मृत्यू ? खुद्द चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला ‘हा’ महत्वाचा खुलासा

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार अल्लू अर्जुन(Allu Arjun) रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) आणि फहद फासिल स्टारर ‘पुष्पा’ चित्रपट प्रचंड गाजला होता. चित्रपटाने कमाईचे नवनवीन रेकॉर्ड करत सर्वांनाच धक्का दिला होता. हा चित्रपट गेल्या वर्षी म्हणजेच  डिसेंबर २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या कथेचे आणि कलाकारांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते.  यानंतर लोक त्याच्या सीक्वलची आतुरतेने वाट पाहत आहेत. सर्वांनाच आता ‘पुष्पा 2’ चित्रपटाची जोरदार उत्सुकता लागली आहे. अशा परिस्थितीत त्याच्या दुसऱ्या भागात श्रीवल्लीचे पात्र मारले जाणार असल्याचे बोलले जात आहे. निर्माता वाय रविशंकर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

‘पुष्पा २’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे बोलले जात आहे. याबद्दल आता चित्रपटाच्या निर्मात्यांनीच महत्वाचा खुलाासा केला आहे. एका  मुलाखतीत बोलताना ‘पुष्पा 2’चे निर्माते वाय रविशंकर यांनी चित्रपटातील रश्मिका मंदानाच्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की “मी अद्याप चित्रपटाची कथा ऐकलेली नाही. असे काहीही होणार नाही आणि ही सर्व अफवा आहे. यावेळी चित्रपटाबद्दल कोणीही काहीही लिहू शकतो, तर कोणालाच त्याबद्दल काहीही माहिती नाही. यामुळे सर्वांचा विश्वास बसेल. अनेक टीव्ही चॅनेल्स आणि वेब साईट्सवरही हे दाखवण्यात आले आहेत, परंतु या सर्व बातम्या खोट्या बातम्या आहेत,”

चित्रपटाच्या शूटिंगबाबत निर्मात्यांनी सांगितले की, ” ‘पुष्पा 2’चे शूटिंग ऑगस्टमध्ये सुरू होणार असून, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच त्याचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या त्याची तयारी सुरू आहे,” त्याचवेळी, अल्लू अर्जुनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘पुष्पा 2’ या चित्रपटाबद्दल उत्सुकता दाखवली होती. या मुलाखतीत बोलताना अल्लू अर्जुनने “चित्रपटासाठी तो खूप उत्साहित आहे कारण त्याला वाटतं की तो दुसऱ्या भागातही खूप चांगली कथा तो प्रेक्षकांना देऊ शकतो,” असे म्हणले होते. त्यामुळे नक्की चित्रपटात श्रीवल्ली मरणार की नाही हे चित्रपट समोर आल्यानंतरच समजेल अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा