अभिनव शुक्लाला आहे ‘ऍडव्हेंचर’ची प्रचंड आवड, ‘या’ पर्वतावरही केलीय अभिनेत्याने चढाई

0
301
Photo Courtesy: Instagram/ashukla09

अभिनव शुक्ला हा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले. त्याचबरोबर तो ‘बिग बॉस 14’ चा स्पर्धक देखील होता. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याने मॉडेल म्हणून काम केले. त्यानंतर त्याला मालिकांमध्ये अभिनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली. इतकेच नव्हे, तर त्याने ‘खतरों के खिलाडी 11’ मध्ये देखील सहभाग नोंदवला होता. या स्टंट शोमध्ये त्या चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले.

View this post on Instagram

A post shared by Abhinav Shukla (@ashukla09)

अभिनव शुक्लाचा सोमवारी (27 सप्टेंबर) वाढदिवस आहे. अभिनव आज त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत मिळवलेले हे यश कमावण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. त्याने सुरुवातीला एक मॉडेल म्हणून काम केले. त्यानंतर टीव्ही मालिकेत आल्यानंतर त्याच्या या प्रवासाला वेग मिळाला. आजच्या या विशेष दिनी त्याच्या जीवनातील काही गोष्टींबद्दल जाणून घेऊ या.

View this post on Instagram

A post shared by Abhinav Shukla (@ashukla09)

अभिनव पंजाबच्या लुधियानामध्ये लहानाचा मोठा झाला. त्याने शिक्षण इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये बीटेक केले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, बीटेक केल्यानंतर लवकरच त्याची मिस्टर बेस्ट पॉटेन्शियल म्हणून निवड झाली. यात तो पहिल्या सहा स्पर्धकांपैकी एक होता. 2004 मध्ये त्याला सर्वोत्कृष्ट भौतिकशास्त्र पुरस्कारही मिळाला. अभिनवने आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात ‘जर्सी क्रमांक 10’ या शोपासून केली.

View this post on Instagram

A post shared by Abhinav Shukla (@ashukla09)

त्याने त्यानंतर ‘गीत’, ‘एक हजारों में मेरी बेहना है’, ‘जाने क्या बात हुई’, ‘छोटी बहू – सिंदूर बिन सुहागन’, ‘हिटलर दीदी’ आणि इतर अनेक शोमध्ये काम केले आहे. 2018 मध्ये, त्याने ‘सिलसिला बदलते रिश्तों का’ मध्ये नकारात्मक भूमिका साकारली. यामध्ये तो राजदीप ठाकूरच्या भूमिकेत दिसला होता. त्याच्या या भूमिकेचे आणि अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

View this post on Instagram

A post shared by Abhinav Shukla (@ashukla09)

अभिनवने फक्त टीव्ही इंडस्ट्री पुरते आपले करिअर मर्यादित ठेवले नाही. त्याने 2014 मध्ये ‘जय हो’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तो इतर काही चित्रपटांमध्येही दिसला आहे. अभिनवला ऍडव्हेंचरची खूप आवड आहे. त्याने स्टोक कांगरीच्या शिखरावर चढाई केली आहे आणि पर्वतारोहणातही आपला ठसा उमटवला आहे. तो एक फिटनेस फ्रिक आहे. त्याचबरोबर व्यस्त वेळापत्रक असूनही तो वर्कआउटसाठी वेळ काढतो. त्याला मैदानी ऍडव्हेंचरचीही खूप आवड आहे. अभिनवचे त्याची पत्नी रुबीना दिलैकसोबत खूप चांगले बाँडिंग तयार झाले आहे. मात्र पुर्वी त्यांच्यामध्ये सतत वाद व्हायचे. शिवाय आता अनेक वेळा हे एकमेकांसोबत फोटो ही शेअर करत असतात. त्याने 21 जून 2018 रोजी रुबीनाशी लग्न केले. ते अनेकदा सोशल मीडियावर असे व्हिडिओ शेअर करतात, ज्यात दोघेही एकमेकांसोबत खूप मजा करताना दिसतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
-जेव्हा महेश भट्ट यांना समजवण्यासाठी नग्नावस्थेत रस्त्यावर धावल्या होत्या परवीन बाबी, मग पुढे…
-Netflix TUDUM: माधुरी दीक्षितचा डिजिटल डेब्यू, तर ‘अरण्यक’च्या धमाक्यासह ‘या’ प्रोजेक्ट्सची झाली घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here