Saturday, July 27, 2024

आपल्या पहिल्याच सिनेमात सोनाक्षीने ‘भाईजान’च्या सल्ल्याने केले होते तब्बल ३० किलो वजन कमी; मिळालेले मानधन तिने…

‘थप्पड से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता हैं’ हा संवाद लोकप्रिय करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी सिन्हा. सोनाक्षीने ‘दबंग’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये दमदार आणि यशस्वी पदार्पण केले. पहिल्याच सिनेमात तिने सलमान खानच्या हिरोइनची भूमिका साकारली. हिंदी चित्रपटांचा इतिहास बघता बहुतकरून अभिनेत्यांचेच सिनेमांमधील संवाद लोकप्रिय आणि अजरामर झाले. मात्र, सोनाक्षी या इतिहासाला अपवाद ठरली आणि तिच्या पहिल्याच सिनेमातील संवाद तुफान गाजला आजही अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तिला हा संवाद म्हणायची रसिकांकडून विनंती केली जाते.

अशा ही ‘दबंग गर्ल’ मंगळवारी (२ जून) आपला ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. २ जून, १९८७ रोजी बिहारच्या पटणामध्ये शॉटगन शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांच्यापोटी सोनाक्षीचा जन्म झाला. सोनाक्षीने शालेय शिक्षण मुंबईतील आर्य विद्या मंदिर येथे झाले. त्यानंतर तिने श्रीमती नाथीबाई दामोदरदास ठाकरे युनिव्हर्सिटीमधून तिने फॅशन डिझायनिंगचे शिक्षण पूर्ण केले.

सोनाक्षीने फॅशन डिझायनिंगमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तिने कॉस्च्युम डिझायनर म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. २००५ साली आलेल्या ‘मेरा दिल लेकर देखो’ या चित्रपटासाठी तिने कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम केले. सोनाक्षी २००८ आणि २००९ मध्ये लॅक्मे फॅशन वीकवर रॅम्प वॉक करताना दिसली होती. त्यानंतर पाच वर्षांनी २०१० मध्ये तिने बॉलिवूड अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्यानंतर सोनाक्षीने कधीच मागे वळून पाहिले नाही.

चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी सोनाक्षीचे वजन खूप जास्त होते. सलमानच्या सांगण्यावरून तिने तिचे वजन कमी केले. सलमानच्या या सल्ल्यानंतर सोनाक्षीने स्वीमिंग, कार्डिओ, डाएट, योगा करून तब्बल ३० किलो वजन कमी केले. तिच्या पहिल्या ‘दबंग’ सिनेमासाठी मिळालेले मानधन तिने सलमानच्याच ‘बिंग ह्युमन’ या एनजीओला दान केले होते.

सोनाक्षीला पेंटिंग आणि स्केचची खूप आवड आहे. ‘लुटेरा’ या चित्रपटात ती पेंटिंग करताना दिसली होती. याशिवाय रॅप करणेही तिला आवडते. तिने अनेक गाण्यांत रॅपिंग केली आहे.

सोनाक्षीने २०१० मध्ये आलेल्या ‘दबंग’ सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. या सिनेमानंतर सोनाक्षीने ‘रावडी राठोड’, ‘सन ऑफ सरदार’, ‘दबंग -२’, ‘लुटेरा’, ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’, ‘बुलेट राजा’, ‘आर राजकुमार’, ‘नूर’, ‘हॉलिडे: अ सोल्जर इज नेवर ऑफ ड्यूटी’, ‘ऍक्शन जॅक्शन’, ‘तेवर’, ‘अकिरा’, ‘मिशन मंगल’ आदी हिट सिनेमांत काम केले. याशिवाय दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्यासह ‘लिंगा’ या सिनेमातसुद्धा सोनाक्षी झळकली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
ऋता दुर्गुळेने केला सासूबाईंबद्दल धक्कादाक खुलासा; म्हणाली, “त्या खूप…”
संघर्षातून पुढे आलेल्या ‘इमली’फेम अभिनेत्रीचा ‘असा’ आहे जीवनप्रवास; एकदा वाचाच

हे देखील वाचा