Monday, December 9, 2024
Home बॉलीवूड ऋता दुर्गुळेने केला सासूबाईंबद्दल धक्कादाक खुलासा; म्हणाली, “त्या खूप…”

ऋता दुर्गुळेने केला सासूबाईंबद्दल धक्कादाक खुलासा; म्हणाली, “त्या खूप…”

मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय चेहरा म्हणजे ऋता दुर्गुळे होय. आपल्या सुंदर आणि सालस सौंदर्याने ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. मराठी टेलिव्हिजनवरील एक लक्षवेधी चेहरा अशी ऋताची खास ओळख आहे. मालिका, नाटक आणि वेबसीरिजमध्ये काम करून तिने प्रचंड नाव कमावले आहे. ऋताचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. तिचे लाखांमध्ये चाहते आहेत. ऋताने नुकताच तिच्या सासूबाईंविषयी खुलासा केला आहे. चला तर जाणून घेऊया ती काय म्हणाली. 

ऋताने (Hruta Durgule ) 18 मे 2022 रोजी दिग्दर्शक प्रतीक शाहशी लग्नगाठ बांधली. तिने अचानक लग्नाचा निर्णय घेतला त्यामुळे तिचे चाहते नाराज झाले होते. या दरम्यान तिने तिच्या सासूबाईंबरोबरच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. ती म्हणाली की, “माझी आई मला नेहमी म्हणायची. मी इथे आहे म्हणून तुला सगळ्या गोष्टी हातात मिळत आहे. लग्न झाल्यावर तुला कळेल काय होत.”

त्यानंंतर ऋताने पुढे सांगितल की, “लग्नाआगोदर मी जितका हक्क आईवर दाखवायटचे तितकाच हक्क आजही मी माझ्या सासूवरती दाखवते. त्यामुळे आमच्यातील सासू सुनेच नात खूप घट्ट आहे. माझ्या लग्नानंतर मी माझ्याबद्दल आणि कामाबद्दल जास्त कॉन्फिडन्ट झाले ते फक्त प्रतीक आणि त्याच्या आईंमुळे. त्या नेहमी सांगतात की, तु आधी करिअरचं बघ, बाकी सगळं नंतर. अशी सासू कुठे मिळते.”

ऋता सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेकदा पोस्ट पाहूण नेटकरी ऋताला ट्रोल करत असतात. तर कित्येकदा ऋताचे चाहते तिच्या पोस्टवर भन्नाट कमेंट करत असतात. ऋता ही खूप लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्याबाबत जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असल्याचे पहायला मिळते. ऋताच्या बाबतीत एक गोष्ट खूप आकर्षक आहे, ती म्हणजे तिच्या हातावरील टॅटू. (Hruta Durgules incident with her mother in law)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
संघर्षातून पुढे आलेल्या ‘इमली’फेम अभिनेत्रीचा ‘असा’ आहे जीवनप्रवास; एकदा वाचाच
हे माहितीये का? इतिहास रचणाऱ्या ‘या’ १७ व्यक्तींचा जन्म पाकिस्तानचा, पण त्यांनी भारतालाच मानले आपले घर

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा