Saturday, June 15, 2024

संघर्षातून पुढे आलेल्या ‘इमली’फेम अभिनेत्रीचा ‘असा’ आहे जीवनप्रवास; एकदा वाचाच

प्रत्येकाला वाटत आपण सुंदर दिसलो की, टिव्हीवर दिसू शकतो. कलाकार खूप सुंदर दिसतात म्हणून त्यांना अभिनय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते. त्यामुळेच त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळते. त्याच कामाचा मोबदला म्हणून खूप सारा पैसाही मिळतो. पण हे खरच सत्य आहे का? तर नाही. कारण या सर्व गोष्टींमागे घेतले जाणारे कष्ट प्रचंड आहे. याबद्दल प्रसिद्धी अभिनेत्री आणि माॅडेल सौम्या सारस्वतने धक्कादायक खुलासा केला आहे.

सौम्या (Saumya Saraswat) सोशल मीडियावर सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा चाहत्यांचे लक्ष वेधत असतात, ज्यावर चाहते तिला भरभरून प्रतिसाद देत असतात. सौम्याने तिच्या करिअरची सुरुवात कोरिओग्राफर म्हणून केली होती. ती तिच्या एका मैत्रिणीसोबत यूट्यूब चॅनलवर डान्स व्हिडिओ अपलोड करत असे. तिने 2017मध्ये त्यांचा पहिला व्हिडिओ अपलोड केला होता.

माध्यमांशी बोलताना सौम्याने तिच्या करियरची सुरूवात कशी झाली. तिला इथपर्यंत येण्यासाठी कोणत्या परिस्थीतीली तोंड द्यावे लागले. तसेच तिने एक कलाकार म्हणुन घडण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते याबद्दल माहिती दिली आहे. सौम्या म्हणाली की, “सुरुवातीला मी या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा माझ्या आई-वडिलांनी मला सपोर्ट केला नाही. मी नियमित नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र जेव्हा मी पाहिलेल माझे स्वप्न पूर्ण होण्यास सुरूवात झाली. तेव्हा ते मला आधार देऊ लागले.”

ती म्हणाली, “खरे सांगू, मी सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. मी पालकांकडून पैसे घेत नव्हते. मी मुंबईला यायचं ठरवलं होत. मी बॅकग्राउंड डान्सर म्हणून सुरुवात केली. त्यावेळी मी PG मध्ये राहिले. यावेळेत काय चूक आणि बरोबर काय हे तुम्हाला कळायला हवं. तुमच्या दिसण्यामुळे तुम्हाला कोणीही नोकरी देणार नाही. भूमिका मिळवण्यासाठी ऑडिशन हा एकमेव मार्ग आहे.”

सौम्या पुढे म्हणाली, “मी संगीत नाटक, नृत्य, असिस्टंट कोरिओग्राफी या सर्व गोष्टी केल्या. कितीही पैसे कमावले तरी मुंबई नेहमीच कमीच पडतो. कधी कधी पैसे नसल्यामुळे मी उपाशी झोपलो आहे. सुदैवाने मी साथीच्या आजाराच्या वेळी घरी होतो आणि मला माझ्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवायला मिळाला.” (Actress and model Soumya Saraswat has made a shocking revelation)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
हे माहितीये का? इतिहास रचणाऱ्या ‘या’ १७ व्यक्तींचा जन्म पाकिस्तानचा, पण त्यांनी भारतालाच मानले आपले घर
नर्गिसची मुलाखत घेताना दत्त साहेबांच्या तोंडातून का फुटला नव्हता एकही शब्द? तुम्हालाही आवडेल किस्सा

हे देखील वाचा