Tuesday, June 25, 2024

‘तारक मेहता’ फेम दिलीप जोशींचा कॉलेज जीवनातील फोटो पाहून व्हाल चकित, संघर्ष काळात असे दिसायचे अभिनेते

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षांपासून या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मालिकेची कथा आणि कलाकार सर्वांनीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत त्यामुळेच या मालिकेतील प्रत्येक कलाकाराशी प्रेक्षकांचे एक खास नाते आहे. मात्र तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत सर्वाधिक चर्चाही जेठालाल म्हणजेच दिलीप जोशींचीच होते. दिलीप जोशींनी (Dilip Joshi) जेठालालच्या भूमिकेत प्रेक्षकांवर चांगलीच भुरळ घातली आहे, त्यामुळेच ते या मालिकेतील सर्वात प्रमुख कलाकार म्हणून ओळखले जातात. काही वर्षांपूर्वीच दिलीप जोशींनी त्यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत. 

दिलीप जोशी हे टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या विनोदी अभिनयाने आणि भूमिकांनी त्यांनी सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तारक मेहता मधील त्यांच्या जेठालालच्या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळते. या भूमिकेने त्यांना घराघरात लोकप्रियता मिळवून दिली. दिलीप जोशी हे सोशल मीडियावर मात्र फारशे सक्रिय नसतात. काही वर्षांपूर्वीच त्यांनी सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो अपलोड केला होता. हा फोटो त्यांच्या कॉलेजवयीन जिवनातील असावा.

दिलीप जोशी यांनी पोस्ट केलेला हा फोटो १९८३ मधील आहे. ज्यावेळी त्यांंनी नुकतीच आपल्या अभिनय कारकिर्दिला सुरूवात केली होती. परंतु हा फोटो आणि आत्ताचे दिलीप जोशींना पाहून तुम्हीही थक्क व्हाल. दरम्यान आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या दिलीप जोशींनी सुरूवातीच्या काळात अनेक छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. पण त्यांना खरी ओळख तारक मेहता मधील जेठालालच्या भूमिकेने मिळवून दिली. इतकेच नव्हेतर ही मालिका मिळायच्या आधी त्यांनी अभिनय जगताला रामराम ठोकण्याचाही विचार केला होता.

हे देखील वाचा