Saturday, July 27, 2024

एकच चर्चा; ‘जेठालाल’ खऱ्या आयुष्यात जगतात कसे? दिलीप जोशींकडे पैसा किती? पाहा तुम्हीच

छोट्या पडद्यावरील कलाकार दिलीप जोशी (Dilip Joshi) म्हणजे तुम्हा सर्वांचा लाडके ‘जेठालाल’ यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यांनी त्यांच्या प्रभावी कामाने स्वतःची मोठी ओळख या क्षेत्रात निर्माण केली आहे. दिलीप गेली १४ वर्षे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Tark mehta ka ooltah chashma ) या मालिकेत जेठालालच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

दिलीप यांनी मोठमोठ्या चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या अनेक भूमिका साकारल्या. मात्र तारक मेहताने त्यांना वेगळी ओळख दिली आहे. या शोमधील आपल्या दमदार अभिनयाने दिलीप हे घराघरात प्रसिद्ध झाले आहेत. हा शो अनेक वर्षांपासून टॉप लिस्टमध्ये आपले स्थान कायम राखत आहे.

दिलीप जोशी यांचे जीवन होते संघर्षमय 

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील प्रत्येक पात्र लोकप्रिय असले, तरी जेठालाल उर्फ ​​दिलीप यांच्या चाहत्यांची यादी वेगळी आहे. दिलीप यांचा जन्म १९६८ मध्ये गुजरातमधील पोरबंदरजवळील एका गावात झाला. दिलीप आज ज्या स्थानावर आहेत त्या पदावर पोहोचणे त्यांच्यासाठी अजिबात सोपे नव्हते. दिलीप यांचे जीवन संघर्षाने भरलेले आहे. सुरुवातीच्या काळातही त्यांना छोट्या भूमिका करण्याची संधी मिळाली.

बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून कामाला केली सुरुवात 

दिलीप यांनी आयुष्यात कधीही हार मानली नाही. मोठ्या चित्रपटांचा भाग असूनही त्यांना फारसे यश मिळाले नाही आणि ते थिएटरशी जोडले गेले. त्यांच्या संघर्षाबद्दल बोलताना दिलीप यांनी त्यांच्या संघर्षाबद्दल सांगितले होते. त्यांनी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केल्याचे सांगितले होते. त्यांना त्यांच्या भूमिकेसाठी ५० रुपये मिळायचे.

हेही वाचा – दिलीप जोशींची यशोगाथा I अवघ्या ५० रुपयांपासून सुरु केले करिअर, आज एका एपिसोडसाठी ‘जेठालाल’ घेतात बक्कळ पैसे

‘या’ चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत ठेवले पाऊल

दिलीप यांनी नाटक आणि मालिकांव्यतिरिक्त चित्रपटांमध्येही काम केले. दिलीप यांनी सलमान खानच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. हा चित्रपट सुपरहिट झाला असला तरी, दिलीप जोशींची व्यक्तिरेखा चित्रपटात कुठेतरी हरवून गेली. या चित्रपटानंतरही दिलीप जोशी यांनी आपला संघर्ष सुरूच ठेवावा लागला. मात्र त्यांना यश मिळाले नाही.

जेठालाल आज जगतात लक्झरी लाइफ 

एकेकाळी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणारे दिलीप आजच्या काळात अतिशय आलिशान जीवन जगतात. आजच्या काळात त्यांना त्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नाही. त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. यासोबतच गोकुळधाम सोसायटीत राहणारे दिलीप यांचे खऱ्या आयुष्यात मुंबईत स्वतःचे आलिशान घर आहे.

जेठालाल बनून जिंकले प्रेक्षकांचे मन

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोने दिलीप जोशी यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. दिलीप यांनी यापूर्वीही असित मोदींसोबत काम केले आहे. असित मोदींनी यापूर्वी दिलीप यांना जेठालालच्या भूमिकेसाठी नाही, तर चंपकलाल म्हणजेच जेठालालच्या वडिलांच्या भूमिकेसाठी संपर्क साधला होता. मात्र, त्यांनी वृद्धाची भूमिका साकारण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर असित मोदीने त्यांना जेठालालची भूमिका दिली आणि या भूमिकेने त्याने सर्वांची मने जिंकली.

अधिक वाचा

‘जेठालाल’ साकारण्यापूर्वी दिलीप जोशींनी ‘या’ चित्रपटात केलंय काम; प्रियांका चोप्राच्या चित्रपटाचाही आहे समावेश

तुम्हाला माहितीये? दिलीप जोशींच्या आधी ‘या’ कलाकारांना ऑफर झालेली ‘जेठालाल’ची भूमिका, नकार देण्याचं कारण तर बघा

अभिनेत्रीसोबत गैरव्यवहार करणे पोलिस कर्मचाऱ्याला पडले महागात, सुरू झाली अंतर्गत चौकशी

हे देखील वाचा